आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडेचार वर्षांचा शौर्य मृत्यूनंतरही पाहणार सुंदर जग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शौर्य - Divya Marathi
शौर्य
नाशिक - नेत्रदान हे श्रेष्ठदान असे नेहमीच म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात तशी वेळ येते तेव्हा कुणीच पुढे येत नाही. मात्र, यास अपवाद ठरले आहेत अवघ्या साडेचार वर्षांच्या शौर्य या मुलाचे आई-वडील... इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या शौर्यचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुत्रवियोगाने व्याकुळ झालेल्या माता-पित्यांनी डोंगराएवढं दुख बाजूला ठेवत सर्वांमधून अचानक निघून गेलेला शौर्य यापुढेही हे सुंदर जग पाहत राहील, या भावनेतून त्याचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतला.

म्हसरूळ परिसरातील प्रभातनगरमधील दत्तछाया अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरून शौर्य परमार पडल्याने गंभीर जखमी झाला होता. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्याने शेवटचा श्वास घेतला. गोड, लोभस शौर्यच्या अकाली जाण्याने आई वैशाली आणि वडील ऋषिकेश यांना काहीच सुचत नव्हते. मात्र, शांत बसलेल्या पित्याच्या मनात वेगळाच विचार सुरू होता. शौर्यकडे एकटक पाहणाऱ्या परमार यांनी शौर्यचे देहदान केल्यास तो कायमचा आपल्यात राहील, असा विचार करत देहदानाचा निर्णय घेतला. डॉ. वसंतराव पवार मेडिकल महाविद्यालयाचे डॉ. श्रीराम गोसावी, डॉ. डी. व्ही. जोशी यांनी डॉ. केळकर यांच्या माध्यमातून पुणे येथील झेडटीसी या संस्थेशी संपर्क साधला. तेथील डॉ. सौ. गोखले यांनी तत्काळ नाशिकमधील तीन हॉस्पिटलशी संपर्क साधून अवयवदानाची प्रक्रिया सुरू केली. मात्र, ‘कार्डियाक डेथ’ झाल्याने अवयवदान शक्य झाले नाही. अखेर परमार यांनी शौर्यचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतला.

अखेर शौर्यचे डोळे काढण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रक्रिया सुरू केली. तुलसी आय हॉस्पिटलच्या नेत्ररोगतज्ज्ञांनी सोमवारी (दि. २१) सकाळी आवश्यक शस्त्रक्रिया यशस्वी केली. सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे, पद‌्माकर इंगळे, सचिन शिरसाठ, जसबिर सिंग, मयूर रौंदळ, डॉ. सुमेध कुऱ्हाडे, डॉ. प्रा. सचिन पाचोरकर, देवदत्त जोशी यांच्यासह पोलिस निरीक्षक विजय लोकरे यांनी परमार कुटुबियांना धीर देत प्रक्रियेसाठी आवश्यक मदत केली. सोमवारी सकाळी शौर्यच्या पार्थिवावर म्हसरूळ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, अवयवदान करण्यासाठी १८००४१९३७३७ या टोल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन झेडटीसीच्या वतीने करण्यात आले आहे.

स्किन बँकांचा अभाव
शहरात देहदान करण्यासाठी प्रभावी यंत्रणा नाही. स्किन बँकेचाही अभाव आहे. तसेच, जनजागृतीचीही गरज आहे. प्रशासनाने यासाठी पाठपुरावा करावा. जितेंद्र
भावे, अवयव दान चळवळ कार्यकर्ता

नवीन इमारती ठरताहेत धोकेदायक
नवीनइमारतींच्या गॅलरीत सुरक्षेसाठी जाळ्या लावता सुशोभित दिसण्यासाठी काचा लावल्या जातात. लहान मुलांसाठी ते धोकेदायक ठरत आहे.

पुढे वाचा.. शौर्यचे आईवडिल काय म्हणतात