आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘शीतल’ साैंदर्यांची सातासमुद्रापार माेहिनी, पटकावला ‘मिसेस बॉलीवूड यूएसए किताब’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शीतल पाटील - Divya Marathi
शीतल पाटील
नाशिक - जळगाव जिल्ह्यातील भडगावच्या कोठलीसारख्या ग्रामीण भागातील शीतल पाटील या उच्चशिक्षित युवतीने अमेरिकेच्या टेक्सास येथील सौंदर्य स्पर्धेत “मिसेस बॉलीवूड यूएसए किताब’ पटकावत उत्तुंग यश मिळवले आहे. शीतलने सातासमुद्रापार मिळवलेल्या यशाने खान्देशाचे नाव अमेरिकेत झळकले आहे.

मुळचे भडगाव तालुक्यातील कोठली येथील रहिवासी सध्या नाशिक येथे वास्तव्यास असलेले रवींद्र सजन पाटील संगीता पाटील यांची कन्या शीतलने इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. जळगावमध्ये उच्च शिक्षणाचा टप्पा पार केल्यानंतर शीतलचा विवाह सॉफ्टवेअर इंजिनिअर योगेश पाटील यांच्याशी झाला. योगेश शीतल पाटील अमेरिकेच्या टेक्सासमधील होस्टन शहरात राहतात.

नाशिक जळगावसारख्या छोट्या शहरांतून अमेरिकेमध्ये गेलेल्या शीतल पाटील हिने मिसेस बॉलीवूड यूएसए या स्पर्धेत सहभाग घेतला. अमेरिकेमधील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत ५० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यंदाच्या सौंदर्य स्पर्धेत सहभागी झालेल्या शीतल पाटीलने चौथे स्थान पटकावले. तसेच ‘मिसेस बॉलीवूड यूएसए किताब’ पटकावत अमेरिकेच्या स्पर्धकांना मागे टाकले. परदेशातील स्पर्धेमध्ये नेत्रदीपक यश मिळवणाऱ्या शीतलमुळे भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. गेल्या सहा वर्षांपासून अमेरिकेमध्ये ही स्पर्धा आयोजित केली जाते. दरवर्षी या स्पर्धेमध्ये अमेरिकेतील सर्व शहरांतून भारतीय महिला स्पर्धक सहभागी होत असतात.विशेष म्हणजे, ही फक्त सौंदर्य स्पर्धा नाही, तर यामध्ये प्रामुख्याने महिलांचा आत्मविश्वास वाढावा, त्यांना समाजात कायमच मानाचे स्थान मिळावे हा हेतू असतो.
पुढे वाचा...
> स्पर्धेतून सामाजिक कार्याला हात
> सासू सासऱ्यांचेही प्राेत्साहन
स्पर्धेतून सामाजिक कार्याला हात
यास्पर्धेतून उभा राहणारा निधी दरवर्षी वेगवेगळ्या संस्थांना त्यांच्या सामाजिक कामांसाठी दिला जातो. या माध्यमातून संस्थांची आर्थिक जबाबदारी स्वीकारली जाते. स्पर्धेचे पूर्ण नाव ‘मिसेस बॉलीवूड पेजीअंट’ असे आहे. या स्पर्धेचे ब्रीद वाक्य ब्युटी विथ परपोज’ हे केंद्रस्थानी ठेवून निवड केली जाते. टीन, मिस आणि मिसेस या प्रकारात ही स्पर्धा विभागलेली आहे.

सासू सासऱ्यांचेही प्राेत्साहन
माझे वडील उद्योजक प्रकाश पाटील व ललिता पाटील यांच्यासह माझ्या या यशात माझ्या सासू-सासऱ्यांनी दिलेले प्राेत्साहनही माेलाचे अाहे. याचबराेबर पतीने वेळाेवेळी मदत करत माझा उत्साह वाढविल्याने यश मिळाले.- शीतल पाटील, विजेती
बातम्या आणखी आहेत...