आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरटी आभाळाखाली, ५० च्या वर फ्लॅट्स दोन दिवसांत बुक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - क्रेडाई नाशिकच्या ‘शेल्टर २०१४ या प्रॉपर्टी प्रदर्शनात दोन दिवसांत ५० पेक्षा जास्त फ्लॅट्सची नोंदणी झाली असून, आतापर्यंत २५ हजारांवर लोकांनी प्रदर्शनास भेट दिली आहे. नाशिक, जळगाव, धुळे, मुंबई, ठाणे येथून लोक भेटीला येत असून, त्यामुळे स्थानिक बांधकाम व्यवसायात चैतन्य संचारले आहे.
घर निवडीचे असंख्य पर्याय, गृहखरेदीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रदर्शनात उपलब्ध १८ वित्तीय संस्थांचे आकर्षक व्याजदर अशा सुविधा एकाच छताखाली उपलब्ध असल्याने प्रदर्शनात उलाढाल वाढत आहे.
दर दोन वर्षांनी शेल्टर प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. घर घेण्यासाठी इच्छुक असणारे त्याची वाट पाहत असतात. प्रदर्शनात बांधकाम व्यावसायिकांकडून दिल्‍या जाणाऱ्या आकर्षक ऑफर्स, स्पर्धात्मक दर, बँकांच्या ऑफर्स आणि विशेष म्हणजे, बांधकाम व्यावसायिकांकडून घडवून आणल्या जाणाऱ्या प्रकल्पभेटी यामुळे घर शोधण्यासाठी वेळ आणि पैशाची बचत होत असल्याने उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या या प्रॉपर्टी प्रदर्शनाला घराचा शोध घेणाऱ्यांकडून आवर्जून भेट दिली जाते. क्रेडाईच्या या सातव्या शेल्टर प्रदर्शनातही हेच दृश्य पाहायला मिळत आहे.
जाणूनघेतली जात आहे प्रकल्पाची माहिती : प्रदर्शनातफ्लॅट, प्लाॅट, रो हाउसेस, पेंट हाउस, बंगलो यांचे सादरीकरण बांधकाम व्यावसायिकांनी केले आहे.
अगदी सामान्यांतील सामान्य सुविधांपासून लक्झरियस अ‍ॅमेनिटीज््पर्यंत सर्व काही येथे उपलब्ध आहे. कुटुंबासह बांधकाम व्यावसायिकांच्या स्‍टॉल्सवरील कर्मचाऱ्यांकडून आवश्यक माहिती मिळवून घेण्यात दंग असलेले अनेक ग्राहक पाहायला मिळतात. बँकांच्या स्‍टॉल्सवर किती कर्ज मिळू शकेल, त्याचा हप्ता काय असेल, याची माहितीही जाणून घेतली जात आहे.
डोंगरे वसतिगृह मैदानावर भरलेल्या शेल्टर प्रदर्शनाचे हे विहंगम आणि विलोभनीय दृश्य कॉडकॉप्टरने टिपले आहे प्रसिद्ध छायाचित्रकार प्रसाद पवार यांनी. या छायाचित्रावरून या प्रदर्शनाची भव्यता, स्वरूप आणि वाहनांच्या अनेक रांगांवरून भेट देणाऱ्यांच्या संख्येचा अंदाज येतो.
सम्राट ग्रुपचे चेअरमन सुजॉय गुप्ता यांनी ग्राहकांना प्रकल्पाची मािहती दिली.