आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिव्य मराठी लिटरेचर फेस्टिवलच्या दुसऱ्या दिवसाचे दुसरे सत्र अमिष यांच्या दिलखुलास मुलाखतीने रंगले. Shifting Sands of time: Myth, Fact and Reality या विषयावर अमिष यांनी रसिकांसोबत संवाद साधला. अमिष यांनी भारतीय पौराणिक कथांवर आधारीत लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकांच्या 35 लाखांपेक्षा अधिक प्रती अवघ्या पाच वर्षात जगभरात विकल्या गेल्या आहेत. \'सर्वाधिक विकला जाणारा भारतीय लेखक\' अशी लोकप्रियता मिळवणाऱ्या अमिषला ऐकण्यासाठी नाशिककरांनी जोरदार गर्दी केली होती. दैनिक भास्कर समुहाचे ब्रँड हेड विकास सिंग यांनी अमिष यांच्याशी संवाद साधला.
हेही वाचा...मराठी लिटरेचर फेस्टीव्हल- मस्त कलंदर प्रतिभेच्या शब्दातून सई यांनी उलगडले मुशाफिरीचे रंग
\'चलनी नोटांमध्ये सध्या करण्यात आलेला बदल देशाच्या हिताचा आहे. यामुळे होणारा त्रास काही दिवस सहन करण्याची तयारी ठेवावी लागेल. शक्य असेल त्यांनी गरजुंना मदत करुन त्यांची अडचण दूर करण्याचा प्रयत्न करावा,\' असे मत अमिष यांनी व्यक्त केले. स्वतंत्र बुद्धी, भावना प्रधानता, सर्जनशीलता ही भारतीय समाजमनाची काही ठळक वैशिष्ट्ये आहे. पण कायदे मोडण्याचे आणि भ्रष्टाचाराचे दुर्गुणही जोडीने आहेत. नागरिक म्हणून शिस्तबद्ध राहणार नसू तर इतरांना दोष देण्याचा बेजबाबदारपणा आपण करता कामा नये, असे त्यांनी सांगितले.
पौराणिक कथांमधल्या हिंसेचे समर्थन करता का, या प्रश्नावर अमिष म्हणाले, कोणत्याही बाबतीतला अतिरेक वाईट असतो. अतिहिंसा जितकी नकोशी त्याच प्रमाणे अहिंसेचाही अतिरेक नसावा. शेजारचा तिबेट बौद्ध तत्वज्ञानाचे आदर्श पालन करणारा सुंदर देश आहे. पण चीन तिबेटला कधीही गिळंकृत करु शकतो. तिबेटी संस्कृती केवळ भारतातच जिवंत राहील अशी स्थिती आहे. हिंसाचाराचे मी समर्थन करत नाही पण पाकिस्तान हल्ला करणार असेल तर आपल्याला संरक्षण करावेच लागेल. सामान्य नागरिकाचा नव्हे पण सीमेवरच्या सैनिकाचा धर्म हिंसा हाच असू शकतो; अन्यथा तो सैन्यातच जाऊ शकणार नाही.
हेही वाचा...शिवरायांची युद्धनिती, सैन्यदलाची रचना उलगडणारे मेधा देशमुखांचे \'चॅलेंजिंग डेस्टिनी\'
पुढील स्लाइडवर वाचा, अमिष त्रिपाठी म्हणाले, उदारमतवादी प्राचिन परंपरा....
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.