आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिंगाडा तलाव परिसरातील मार्केटची दुरवस्था

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शिंगाडा तलाव परिसरातील अग्निशामक दलाच्या कार्यालयाजवळ असलेल्या महापालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या मार्केटची दुरवस्थ झाली आहे. या मार्केटमध्ये काही गाळे अजूनही बंद असल्याने येथे दिवस-रात्र टवाळखोरांचा धुमाकूळ सुरू असल्याचे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. मार्केट परिसरात घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. शिंगाडा तलाव परिसरात महापालिकेतर्फे कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या मार्केटमधील अनेक गाळे बंद आहेत. या मार्केटच्या गाळ्यांचा लिलाव झाला की नाही, याचीदेखील महापालिकेच्या अधिका-यांवर कल्पना नाही. त्यामुळे हे गाळे अजूनही पडून आहेत. मोकळ्या पडलेल्या या इमारतीत दिवस-रात्र टवाळखोरांचा वावर असतो. काही व्यापाऱ्यांनी गाळ्यात व्यवसाय सुरू केले. मात्र, येथे पाणी, शौचालय आदींची सोय नाही. त्यातच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरले असून, दुर्गंधीही पसरली आहे. मार्केटला वीजपुरवठा करणारी डीपीदेखील उघडी पडली असून, अपघात होण्याचा धोका आहे. टवाळखोरांमुळे रात्री येथून ये-जा करणाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. त्वरित कारवाईची मागणीही महिलांनी केली आहे.
गाळेमालकांनी व्यवसाय करावा
येथील गाळेमालकांनी व्यवसाय सुरू करणे गरजेचे आहे. मात्र, त्यासाठी महापालिकेनेदेखील सर्व सुविधा देणे गरजेचे आहे. या ठिकाणी असलेल्या अस्वच्छतेकडे आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. दुर्गंधीमुळे नागरिकांना त्रास होत आहे. येथे वावरणाऱ्या टवाळखोरांमुळे महिलांनादेखील मोठी गैरसोय सहन करावी लागते. नरेंद्र सैगल, नागरिक