आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shinhasth, 24 Hours Service Provider Of 50 Chemist

सिंहस्थात ५० केमिस्ट देणार २४ तास सेवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शहरातील४० केमिस्ट सिडकोतील १० असे ५० केमिस्ट हे सिंहस्थ कुंभमेळा काळात २४ तास सेवा देणार आहेत. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या भाविकांची, नागरिकांची गैरसोय होणार नाही. त्यांना तत्पर सेवा मिळेल. शिवाय या केमिस्टला पोलिस संरक्षण पाहिजे असल्यास त्याचीही पूर्तता केली जाणार असल्याची माहिती अन्न औषध प्रशासनाचे सहआयुक्त दुष्यंत भामरे यांनी दिली.
सिडकोतील निकिता मंगल कार्यालयात मंगळवारी (िद. २८) सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक केमिस्ट असोसिएशनच्या वतीने अायाेजित विशेष बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना भामरे बोलत होते. सर्व केमिस्ट हे काम करताना कायद्याचे बंधन पाळतील. जे पाळणार नाहीत त्यांच्यावर कठाेर कारवाई होईल. ऑनलाइन फार्मसी ही एक चांगली संकल्पना आहे. सर्व केमिस्ट फार्मासिस्ट समाजाचे भान ठेवून काम करतील. त्यांच्या कामाची पद्धत ही राज्यातील नव्हे, तर देशातील आदर्शवादी असावी, असा आपला प्रयत्न राहावा. समाजसेवेसाठी कटिबद्ध राहून आपला नावलौकिक वाढवावा. आपण सर्वच चांगले काम कराल, असा मला विश्वास वाटतो, असेही भामरे यांनी सांगितले. या वेळी सहायक आयुक्त प्रमोद कातकाडे, औषध निरीक्षक राजेश बनकर, वर्षा चौधरी, जीवन जाधव यांच्यासह गोरख चौधरी, उपेंद्र दिनानी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अध्यक्ष मनोज लोढा, राहुल ब्राह्मणकर, संजय अाेसवाल, अभय शिराेडे, गिरीश महाजन, मयूर अलई, जगदीश भोसले यांनी प्रयत्न केले. यावेळी सिडकोतील जितेंद्र गिरासे, अभय शिरोडे, संजय अमृतकर, नीलेश कुलथे, संजय चौधरी आदींसह १५० ते २०० केमिस्ट उपस्थित होते.

अशी अाहे केमिस्टची तयारी
सिंहस्थकुंभमेळ्याच्या काळात केमिस्टकडून शहरात कुठेही औषधांचा तुटवडा भासणार नाही यासाठी प्रयत्न.
गरजवंतांना ते अाहेत त्या ठिकाणी तत्काळ सुविधा देण्यात येईल.
सर्व केमिस्टने कायद्याचे पालन करावे, तसे केल्यास असाेसिएशन करणार कायदेशीर कारवाई
२४ तास सेवा देणाऱ्या केमिस्टला गरज पडल्यास पाेलिस संरक्षण मिळवून देणार.
गंभीर अाजार असल्यास रुग्णाने एफडीएशी संपर्क साधल्यास त्याला तत्काळ सेवा देण्यात येईल.

गरज भासल्यास घरपाेहाेच अाैषध पुरवठा
^कुंभमेळापर्वणीकाळात सलग तीन िदवस शहरातील प्रमुख मार्गांवर सर्व वाहतूक बंद राहणार अाहे. या कालावधीत अतिगंभीर अथवा अत्यावश्यक अाैषधांची गरज भासल्यास रुग्णांच्या नातलगाने संपर्क साधल्यास एफडीएच्या परवानगीनुसार घरपाेहाेच अाैषधे पाेहोचविण्यात येतील. यासाठी एफडीएच्या ०२५३-२३१८१८७ क्रमांकावर संपर्क साधावा. गिरीशमहाजन, माजी अध्यक्ष, केमिस्ट असाेसिएशन