आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डीत दर्शनरांगेतच पाणी अन् नाष्टाही: प्रमुख रस्ते नो ‘व्हेइकल झोन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी - नाशिक येथील कुंभमेळ्याच्या विविध चार पर्वण्यांच्या काळात शिर्डीत सुमारे २५ लाख भक्तांना साईदर्शन सुखर होण्यासाठी संस्थान प्रशासनाबरोबरच जिल्हा प्रशासन सज्ज झाले अाहे. नगर-मनमाड मार्गाच्या दोन्ही बाजूंनी चार किलोमीटर अंतरावर वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करतानाच पर्वणीच्या काळात शिर्डीतील प्रमुख रस्ते ‘नो व्हेइकल झोन’ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वतंत्र दर्शन रांगेमध्येच स्वच्छतागृह, पाणी, नाष्टा साईसंस्थान उपलब्ध करून देणार आहे. संस्थानने ५७ कोटींच्या कामांना सुरवातही केली आहे. राज्य सरकारच्या १५४ कोटींच्या कामांचे प्रस्ताव दाखल केले असले तरी कामे सरकार कधी सुरू हाेणार असा प्रश्न आहे.
साईबाबा संस्थान सध्या १८ हजार ७०० भक्तांची व्यवस्था करीत आहे. शहरातील खासगी हॉटेल्स व लॉजेसच्या ९१५४ खोल्या आहेत. यातून सुमारे ३६ हजार ६०० भक्तांची निवास व्यवस्था होऊ शकते. उर्वरित लाखो भक्तांची कशी व्यवस्था करायची हा मोठा प्रश्न प्रशासनापुढे पडला आहे. कुंभमेळा कालावधीत येथे येणारे साधूसंत व महंत यांच्यासाठी साई धर्मशाळा विभागातील दोन इमारती राखीव ठेवण्यात येणार आहेत.

साई प्रसादालय, साईबाबा भक्तनिवास, साईआश्रम, द्वारावती भक्त निवासात ३५ हजार साईभक्त भोजनाचा लाभ घेतात. गर्दीच्या काळात ही संख्या १ लाखापर्यंत जाते. मात्र, सिंहस्थ काळात भक्तांना दर्शन रांगेतच प्रसाद व भोजनाचे पाकिटे देण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. त्या दृष्टीने संस्थान प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. या काळात शिर्डी परिसरात १० विविध ठिकाणी तात्पुरती वाहनतळांची उभारणी करण्यात येत असलेल्या ठिकाणीच अन्न पाकिटे उपलब्ध करून देण्याची कार्यवाही संस्थान करणार आहे. खासगी उपाहारगृहांमार्फत खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याचे प्रयोजन आहे.
दर्शन रांगाचे नियोजन
सध्या साई मंदिर परिसरात दर्शन रांगेचा हॉल, जुना पिंपळवाडी रस्ता या ठिकाणी अंदाजे एकाचवेळी १५ हजार क्षमतेची दर्शन रांग उपलब्ध आहे. कुंभमेळा कालावधीत भक्तांच्या सोयीसाठी नगर-मनमाड राज्य मार्गावर दक्षिणेकडून शासकीय विश्रामगृह व उत्तरेकडून साईबाबा भक्तनिवास ते महाद्वार क्र.१ पर्यंत तसेच जुन्या पिंपळवाडी रस्त्यावर हॉटेल एमटीडीसी ते महाद्वार क्र.२ पर्यंत अतिरीक्त दर्शन रांगेचे नियोजन करण्यात आले आहे. निवासस्थाने व इतर मोक्याच्या ठिकाणी डिजिटल स्क्रीनवर दर्शन व्यवस्था करण्याबरोबरच साईंचे मुख दर्शनासाठी दरवाजे उघडे ठेवण्याचा कालावधी वाढवला जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...