आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्य पक्षांतील नगरसेवकांना शिवसेना घेणार कवेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेच्या अागामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने अाता संघटन वाढविण्यास सुरुवात केली असून, अन्य पक्षांतील पदाधिकारी नगरसेवकांनाही कवेत घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या अाहेत. भाजपच्या गळाला लागलेल्या काही नगरसेवकांच्या संपर्कात अाता शिवसेनेचे पदाधिकारी असून, लवकरच पक्षप्रवेश करवून घेण्याचे प्रयत्न पक्षीय पातळीवर सुरू अाहेत.

शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून नाशिक शहराची अाेळख हाेती. परंतु, महापालिकेच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत मनसेने ही अाेळख पुसून टाकली. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत शहरातील तीनही जागांवर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केल्याने शिवसेनेचा हा किल्ला अधिक ढासळला हाेता. लाेकसभा निवडणुकीनंतर पक्षाला पुन्हा एकदा मानाचे पान मिळाले. या वर्षाच्या अखेरीस महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक हाेण्याची शक्यता अाहे. त्या दृष्टीने अाता सर्वच राजकीय पक्षांनी माेर्चेबांधणी सुरू केली अाहे. भाजपने अाक्रमक भूमिका घेत मनसेच्या काही नगरसेवकांना पक्षात घेण्याचे प्रयत्न सुरू केले हाेते. परंतु, अंतर्गत धुसफुशीतून हा प्रयत्न हाणून पाडण्यात अाला. भाजपने जमा केलेल्या या नगरसेवकांशी अाता शिवसेनेचे पदाधिकारी संपर्कात असल्याचे वृत्त अाहे. या सर्वांचा एकाच वेळी पक्षप्रवेश करून मनसेला जाेरदार धक्का देण्याच्या तयारीत शिवसेनेचे पदाधिकारी अाहेत. याशिवाय, संघटनवाढीसाठी सिडकाे, सातपूर, नाशिकराेड या भागात पक्षप्रवेशाचे साेहळे सध्या सुरू अाहेत.

शहराबराेबरच जिल्ह्यावरही शिवसेनेने लक्ष केंद्रित केले अाहे. त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना शिवसेनेत आणण्यात पदाधिकाऱ्यांना यश अाले अाहे. यात नगरसेविका तृप्ती धारणे, रवींद्र सोनावणे, अंजनाबाई कडलग, अलकाबाई शिरसाठ, शकुंतला वटाणे, रवींद्र गमे, सिंधूताई मधे, ललित लोहगावकर या नगरसेवकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्याचप्रमाणे नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनीही उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यापुढे शिवसेनेने इगतपुरी तालुक्यातील अन्य पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या शिवसेना प्रवेशासाठी प्रयत्न सुरू केले अाहेत.

पुढे वाचा.. शिवसेनेत मिळताे याेग्य सन्मान
बातम्या आणखी आहेत...