आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena BJP Alliance News In Marathi, Divya Marathi

सर्वेक्षण: महायुतीचा जागावाटपाचा तिढा; मत बदलासंदर्भात संमिश्र कौल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गेल्या काही दिवसांपासून महायुतीतील मुख्य घटक पक्ष शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात जागावाटपावरून निर्माण झालेला तिढा अगदी २५ वर्षांपासून असलेली युती तुटणार इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. यासंदर्भात होत असलेल्या चर्वितचर्वणाचा त्यांच्या मतदारांमध्ये युतीबद्दलचे मत बदलण्यावर संमिश्र मतप्रवाह असल्याचे विशेष सर्वेक्षणातून पुढे आले आहे. औरंगाबादमध्ये मात्र मतदार युतीच्या पाठीशी उभे असल्याचे दिसतात.

आता महायुती तुटणारच इथपर्यंत महायुती ताणल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे ‘दिव्य मराठी’ने विविध क्षेत्रांतील व्यक्तींकडून ‘युतीबद्दलचं मत बदलतंय का?’ या प्रश्नाद्वारे कौल घेतला. त्यात नाशिकमध्ये ४८ टक्के लोकांनी मतांमध्ये बदल होईल असे सांगितले, तर ५२ टक्के लोकांना ही साहजिकता वाटते.

‘दिव्य मराठी’च्या वेबसाइटवर मात्र ५० टक्के लोक मतबदलाचा विचार करणार असल्याचं म्हणत असून, ४५ टक्के लोकांनी याबद्दल पुनर्विचार करण्याची गरज नसल्याचं मत दिलं आहे. ५ टक्के मतदारांनी काहीच सांगता येत नसल्याचं मत व्यक्त केलं आहे. औरंगाबादमध्ये मात्र मतदारांचा कौल महायुतीकडेच आहे. ६४ टक्के मतदारांना मतांमध्ये बदल होण्याची वा बदल करण्याची गरज नसल्याचं वाटतं, तर ३६ टक्के मतदार यावर परिणाम होईल असं नोंदवतात.
सध्याचं युतीच्या पथ्यावर असलेलं वातावरण, मोदी इफेक्ट आणि महायुतीची १०० दिवसांची केंद्रातील कामगिरी यामुळे दोन्ही पक्ष पुढे जाण्याची रस्सीखेच करत आहेत आणि ते स्वाभाविक असल्याचे काहींनी सांगितले. भाजपच्या जास्त जागा निवडून आल्या तर भविष्यात शिवसेनेला जड जाईल, त्यामुळे आतापासूनच शिवसेना कठोर भूमिका घेत असल्याचाही एक मतप्रवाह आहे. तर, अनेकांच्या मते ही शुद्ध फसवणूक असून, केवळ या लोकांना पितृपक्ष पुढे ढकलायचा आहे.
असा विचार हे पक्ष करत असल्याची उिद्वग्नताही व्यक्त झाली. यासंदर्भातील अंदाजांची ग्राफिक्सच्या माध्यमातून केलेली ही मांडणी...

‘दिव्य मराठी’ने जाणून घेतला विविध क्षेत्रांतून अंदाज
* नाशिक - 48% लोक म्हणतात मतं बदलतील
52% लोक म्हणतात मतं बदलणार नाहीत

* औरंगाबाद - 36% लोक म्हणतात मतं बदलतील
64% लोक म्हणतात मतं बदलणार नाहीत
* वेबसाईट
05% सांगता येत नाही
45% लोक म्हणतात मतं बदलणार नाहीत
50% लोक म्हणतात मतं बदलतील