आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील नगरपंचायतींत सेना-भाजपचाच बोलबाला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या निवडणुकीत केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजप-सेनेचाच बोलबाला राहिला. सेना-भाजपने प्रत्येकी २२ जागा मिळवित आपली दावेदारी पुन्हा एकदा सिद्ध केली, तर १७ जागी अपक्षांनी बाजी मारली असून, तीन नगरपंचायतींत सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांच्यावर भिस्त राहाणार आहे.

सर्वाधिक चर्चेत चांदवडमध्ये भाजपने १७ पैकी जागा मिळविल्या असून, शिवसेनेने जागा जिंकल्या आहेत. निफाड, सुरगाणा आणि पेठमध्येही भाजप-शिवसेना एकत्र आल्यास त्यांना सहज सत्ता स्थापन करता येणार आहे. निफाडमध्ये भाजप-शिवसेनेने प्रत्येकी जागा मिळविल्या असून, ते एकत्र आल्यास सत्तेसाठी आवश्यक जागांपेक्षाही एक जागा त्यांच्याकडे अधिक असेल. सुरगाण्यातही भाजपने ७, तर शिवसेना आणि माकपने प्रत्येकी जागा मिळविल्या असल्याने तेथे सत्तेचे समीकरण कुठल्याही पक्षांसोबत जुळून येऊ शकते. पेठमध्ये मात्र शिवसेनेने सर्वाधिक जागा मिळविल्या असून, भाजपला अवघी जागा मिळाली आहे. मात्र, सत्तेसाठीचा जादुई आकडा असल्याने दोघे एकत्र आल्यास फारशी चिंता नसेल, अन्यथा अपक्षही येथे किंगमेकर ठरू शकतो. कळवणमध्ये मात्र राष्ट्रवादीने बाजी मारत जागा मिळविल्या असून, काँग्रेसनेही जागा जिंकल्याने आघाडी झाल्यास त्यांना सत्ता स्थापण्याची संधी आहे. देवळ्यात मात्र इतिहास घडला असून, एकाही राष्ट्रीय पक्षाला येथे यश मिळाले नसून, देवळा विकास आघाडीने जागा मिळविल्या आहेत. जनशक्तीने ३, तर अपक्षांनी जागा मिळविल्या आहेत.

संख्याबळ असे
>चांदवड: भाजप५, शिवसेना ३, काँग्रेस ४, राष्ट्रवादी २, अपक्ष
>कळवण: राष्ट्रवादी७, काँग्रेस ३, भाजप ४, शिवसेना १, अपक्ष
>देवळा: देवळाविकास आघाडी ९, जनशक्ती ३, अपक्ष
>निफाड: शिवसेना५, भाजप ५, राष्ट्रवादी ३, काँग्रेस १, अपक्ष
>सुरगाणा: भाजप७, माकप ५, शिवसेना
>पेठ: शिवसेना८, भाजप १, माकप २, राष्ट्रवादी ३, अपक्ष
बातम्या आणखी आहेत...