आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Chief Uddhav Thackeray Comes Out In Support Of Kanhaiya Kumar

कन्हैयाचे ‘जन्मदाते’ कोण? उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारसह संघाला टोला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- ‘तरुणांच्याया देशात जाे पुढे येताे त्याला देशद्राेही ठरवले जाते. राेहित वेमुला, हार्दिक पटेल अाणि अाता कन्हैया या तिघांनाही देशद्राेही ठरवण्यात अाले. त्यातूनच वातावरण अस्थिर झाले अाहे. केंद्र सरकारला यातून धाेका उदभवू शकताे की अाधार ठरू शकताे हे येणारा काळ सांगेलच. पण कन्हैयाचा जन्म का झाला? त्याचे जन्मदाते काेण?’ असा सवाल उपस्थित करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे माेदी सरकारसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाच टाेला लगावला.

शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्र पदाधिकारी शिबिराच्या पार्श्वभूमीवर शहरात अालेल्या ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना भाजपवर टीकेचा सूर कायम ठेवला. स्वतंत्र विदर्भासारखी छाेटी राज्ये करण्यामागचा सरकारचा हेतू काय अाहे, असा सवाल करीत त्यांनी उत्तराखंडचा दाखलाही दिला.

युतीची मानसिकता संपली : हिंदुत्वाच्यामुद्द्यावर शिवसेनेने भाजपबराेबर युती केली हाेती. परंतु हा मुद्दा जर बाजूला पडत असेल तर अशी युती म्हणजे व्यावहारिक तडजाेड ठरेल. अाजच्या घडीला शिवसेना भाजप हे दाेन्ही पक्ष युतीच्या मानसिकतेतून बाहेर पडले अाहेत, असे सांगत उद्धव यांनी महापालिकेसह जिल्हा परिषदांच्या अागामी निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याचे पुन्हा एकदा स्पष्ट संकेत दिले. भाजप हा मित्रपक्ष अाहे अाणि चुका करणाऱ्या मित्राला वेळच्या वेळी सावध करणे हे अामचे कर्तव्यच अाहे, असाही टाेला त्यांनी लगावला.

दारूसाठी की पिण्यासाठी प्राधान्य? : आज २२ ते २३ काेटींची थकबाकी असलेल्या दारूच्या कारखानदारांना सर्रासपणे पाणी दिले जात अाहे. दुसरीकडे शेतकरी कर्जबाजारी हाेऊन अात्महत्या करीत अाहे. अशा प्रसंगी न्याय काेणाला द्यायला हवा, असा सवाल उद्धव यांनी केला. ‘संतापाच्या भरात मी काही बाेललाे, तर त्याला भांडण म्हणायचे का? कन्यादान याेजनेच्या मेळाव्यात मी पाण्याचा प्राधान्यक्रम ठरवावा, असे सुचवले हाेते. पिण्याच्या पाण्याला की दारूच्या पाण्याला प्राधान्य द्यावे हे सरकारने प्रथम ठरवावे असे मी म्हटलाे हाेताे. त्यात गैर काय हाेते. परंतु अामच्यात विसंवाद अाहे असे सांगून माध्यमांनी अामच्यावरच टीका केली,’ असेही ते म्हणाले.

देसाईंना धमकी देणारे अराफत यांना समज
भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी हाजी अली दर्ग्यात प्रवेश केला तर चपलांचा प्रसाद देऊ, असा इशारा शिवसेनेच्या वाहतूक सेनेचे प्रदेश अध्यक्ष हाजी अराफत यांनी दिला अाहे. त्यावर ‘अराफत यांनी या प्रकरणाला राजकीय रंग देऊ नये,’ अशी समज ठाकरे यांनी दिली. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेशाच्या निर्णयाच्या अाड अाम्ही अालाे नाही. त्यामुळे अन्य काेणाची बाजू घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही ते म्हणाले.

ठाकरेंची डबल ढाेलकी
युतीच्या मानसिकतेतून दाेन्ही पक्ष बाहेर पडले अाहेत, असे सांगतानाच दुसरीकडे मात्र भाजपची युतीबाबतची भूमिका स्पष्ट हाेणे गरजेचे अाहे, असेही ठाकरे म्हणालेे. युतीबाबतचा निर्णय शिवसेनेच्या मनावर अाणि मतावर अाहे, असे त्यांनी सांगितले. या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रमच निर्माण झाला अाहे.

भाजपविषयी माैनच
भाजपविषयी मी माझ्या निवेदनात कधीही बाेलत नाही. पत्रकार मला तशा स्वरूपाचे प्रश्न विचारतात त्याला केवळ मी उत्तर देताे. परंतु त्याचा अर्थ असा घेतला जाताे की सरकारशी मी नेहमीच भांडताे. येथून पुढे प्रश्न विचारणाऱ्यांवरही कॅमेरा घेत जा, असा सल्ला उद्धव यांनी वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना दिला.

पुढील स्लाइडवर वाचा, उद्धव ठाकरेंचा खडा सवाल: राज्ये काबीज करायची तर लोकशाही कशाला?