आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना करणार साेशल अाॅडिट, मंत्र्यांना खूश ठेवण्याची कसरत करणाऱ्यांना देणार अहवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मराठवाड्याला पाणी देऊन नाशिककरांची कुचंबणा करणाऱ्यांकडून अाता साेशल वाॅटर अाॅडिटच्या नावाखाली पालिकेसाठी अारक्षित असलेले पाणीही कमी करण्याचा घाट घातला जात असल्याचा अाराेप करीत ३० दिवसांत घराेघरी फिरून प्रत्यक्ष किती पाणी मिळते, याचा अहवाल तयार केला जात असल्याची माहिती शिवसेना गटनेते अजय बाेरस्ते यांनी दिली.

१३५ लिटर प्रतिमाणसी पाण्याचा फाॅर्म्युला अाताच पालकमंत्री महापालिकेला कसा अाठवला, असा सवाल करीत त्या नावाखाली सध्या उपलब्ध असलेले नाशिककरांचे पाणीही कमी करण्याचा घाट तर नाही ना, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.

मराठवाड्याला पाणी गेल्यानंतर नाशिककरांवर माेठ्या पाणी कपातीचे संकट अाले अाहे. त्यास दिलासा देण्याचे साेडून साेशल वाॅटर अाॅडिटच्या नावाखाली नाशिककर कशी पाण्याची उधळपट्टी करतात, असे दाखवण्याचा प्रयत्न हाेत असल्याची खंत बाेरस्ते यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, मुळात वाॅटर अाॅडिटसाठी जवळपास दाेन काेटी खर्च करून प्रक्रिया सुरू झाली असताना साेशल वाॅटर अाॅडिटचे खुळ कसे निघाले. मुळात शहरात साडेचार लाखांहून अधिक मिळकती असून, ९० जलकुंभांवर अाधारित सरासरी याप्रमाणे ४५० घरांत जाऊन पाण्याची किती गळती हाेते किती वापर हाेताे, हा निष्कर्ष काढणे राेगापेक्षाही इलाज भयंकर असाच म्हणावा लागेल, असा अहवाल सेना खपवून घेणार नाही, असा इशारा देत प्रथम गळती वितरण व्यवस्थेतील दाेष सुधारून दाखवावे, असेही अायुक्तांना अाव्हान त्यांनी दिले. नगरसेवकांनी महासभेत यापूर्वीच गळती वितरण व्यवस्थेतील दाेषावर घसाफाेड केली. मात्र, त्यावेळी साेशल वाॅटर अाॅडिटची संकल्पना सुचली नव्हती. अाता मराठवाड्याला पाणी साेडल्यानंतर विशिष्ट व्यक्तींची हाेणारी दाणादाण थांबविण्यासाठी हा फंडा काढला नाही ना, असाही संशय व्यक्त केला. दरम्यान, शिवसेना घराेघरी जाऊन पाणी वापराचे सर्वेक्षण करून अहवाल ठेवला जाणार असल्याचे बाेरस्ते यांनी स्पष्ट केले.

महापाैरांचे पालकमंत्र्यांवर शरसंधान
प्रथममुबलक पाणी अाहे, नाशिककरांवर कपातीचे संकट येणार नाही, असे लेखी पत्र काढून दावा करणाऱ्या पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दाेन दिवसांपूर्वी १३५ लिटर प्रतिमाणसी असा फाॅर्म्युला मांडल्यानंतर अाता त्यांच्यावर टीकेचे बाण सुटू लागले अाहेत. शिवसेनेपाठाेपाठ महापाैर अशाेक मुर्तडक यांनीही प्रशासनाने ४७ दिवसांची पाण्याची तूट असल्याचे सांगितल्यावर अाठवड्यातून एक दिवस पाणी बंदचा जाे निर्णय घेतला तीच भूमिका अाता भाजपला मान्य करावी लागत असल्याकडे लक्ष वेधले. शहराला पावसाळ्यापर्यंत पुरेल इतके पाणी देण्याचे सर्वपक्षीयांचे नियाेजन हाेते. मात्र, त्यावेळी खाेडा घातला गेला. अाता मात्र भाजपकडून १३५ लिटर प्रतिमाणसी पाण्याच्या फाॅर्म्युलाचा राग अाळवून त्याच्याशीच समरस भूमिका घेतली जात असल्यामुळे पालकमंत्र्यांना अाता काेठे महासभेचे म्हणणे पटलेले दिसते, असाही चिमटा त्यांनी घेतला.