आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहणी दौ-याकडे महापौरांची पाठ; शिवसेनेने दिला मनसेला अल्टिमेटम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- त्र्यंबकचाकचरा खत प्रकल्पात घेण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या मनसेकडून खत प्रकल्प सुरू करण्याच्यादृष्टीने साधी पाहाणी हाेत नसल्यामुळे शिवसेनेने नाराजी व्यक्त करत अखेरचा इशारा दिला आहे. तीन महिन्यांत खत प्रकल्प सुरू झाल्यास ठिय्या आंदोलन करण्याची भूमिका कायम असल्याचे शिवसेना गटनेते अजय बोरस्ते विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
त्र्यंबकचा कचरा घेण्यासाठी मनसेच्या नगरसेवकांचा विरोध होता. त्यानंतर राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नगरसेवकांनी विराेध करीत महासभेत प्रस्ताव फेटाळण्याची मागणी केली हाेती मात्र मुख्य सचिवांचे निर्दश सिंहस्थ कुंभमेळ्याची पार्श्वभूमी लक्षात घेता, कचरा स्वीकारण्याबाबतचे अधिकार अायुक्तांना देण्यात अाले. त्यानंतर कचरा घेण्याबराेबरच खत प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे अशीही मागणी शिवसेनेने केली हाेती. त्यावर महापाैर अशाेक मुर्तडक यांनी खत प्रकल्पाची पाहणी करून यंत्रणा कार्यान्वित करण्याचे अाश्वासन िदले हाेते. प्रत्यक्षात, त्याची पूर्तता हाेत नसल्यामुळे शिवसेनेने गेल्या अाठवड्यात खत प्रकल्पाची पाहणी केली हाेती. मनसेकडून खत प्रकल्प सुरू करण्यासाठी पावले उचलली जात नसल्यामुळे शिवसेना अाक्रमक झाली अाहेत.
कोबंडे यांचा विरोध कसा मावळला?
खतप्रकल्पात त्र्यंबकचा कचरा घेण्यासाठी मनसे नगरसेवक सुदाम काेंबडे यांचा विराेध हाेता. महासभेत अायुक्तांना अधिकार दिल्यावर काेंबडे यांनी थेट व्यासपीठावर जाऊन महापाैरांना विषय नामंजूर करण्याची मागणी केली हाेती. खत प्रकल्प सुरू करण्यासाठी पाहणी दाैऱ्याचे अाश्वासन दिल्यावर काेंबडे यांनी संयमी भूमिका घेतली. प्रत्यक्षात या मुद्याकडे मनसेचे दुर्लक्ष हाेत असताना काेंबडे यांचा विराेध मावळला कसा असा सवालही बाेरस्ते यांनी केला.