आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराेधी पक्षनेतेपदाच्या लढाईत शिवसेनेची बाजी, मनसे राष्ट्रवादी काँग्रेसला बसला धक्का

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गेल्या चार वर्षांपासून शिवसेना राष्ट्रवादीत महापालिकेतील विराेधी पक्षनेतेपदावरून सुरू असलेल्या कुरघाेडीच्या राजकारणात पुन्हा शिवसेनेने बाजी मारली अाहे. राज्याच्या नगरविकास खात्याने विद्यमान विराेधी पक्षनेत्या कविता कर्डक यांची नियुक्ती रद्द केल्यामुळे मनसे राष्ट्रवादीला धक्का बसला अाहे. तीन महिन्यांपूर्वी मनसेने तत्कालीन विराेधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांची नियुक्ती रद्द करून शिवसेनेला शह दिला हाेता.

चालू पंचवार्षिकमध्ये म्हणजे सन २०१२ मध्ये झालेल्या महापालिकेलच्या निवडणुकीनंतर सर्वाधिक नगरसेवक असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भारतीय जनता पक्षाला साेबत घेऊन सत्ता स्थापन केली. त्यानंतर विराेधी पक्षनेतेपदावरून शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू हाेती. शिवसेनेचे १९, तर रिपाइंचे अशा २२ नगरसेवकांचा एकत्रित गट विभागीय अायुक्तांकडे नाेंदवण्यात अाला. दुसरीकडे राष्ट्रवादीकडे २० नगरसेवक हाेते.

शिवसेना रिपाइं मिळून २२ नगरसेवक असल्यामुळे सर्वाधिक नगरसेवक असलेला गट विराेधी पक्षनेतेपदासाठी ग्राह्य ठरवण्यात अाला. त्यानुसार, शिवसेनेचे बडगुजर यांना विराेधी पक्षनेतेपद दिले गेले. त्यास राष्ट्रवादीने अाक्षेप घेत २० नगरसेवक असल्यामुळे म्हणजेच स्वतंत्ररीत्या शिवसेनेचा विचार केला तर एक नगरसेवक अधिक असल्यामुळे विराेधी पक्षनेतेपदावर दावा केला हाेता.

यासंदर्भात उच्च न्यायालयात धावही घेतली हाेती. त्यावर निर्णय बाकी असताना तब्बल तीन वर्षे वाद सुरूच राहिला. अशातच दुसऱ्या टर्मकरिता मनसेने राष्ट्रवादीच्या मदतीने महापाैरपद मिळवत सत्ता स्थापन केली. त्यानंतर १८ मार्च २०१५ राेजी मनसेने शिवसेनेला धक्का देत राष्ट्रवादीच्या कर्डक यांना विराेधी पक्षनेतेही मिळवले. त्यानंतर बडगुजर यांनी शासनस्तरावरून स्थगिती मिळवण्यासाठी पाठपुरावा केला. भाजपचे अामदार बाळासाहेब सानप यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तसेच त्यांच्या अखत्यारीतील नगरविकास खात्याकडे याबाबत तक्रारही केली हाेती. त्यावर नगरविकास खात्याने चाैकशी करून दिलेल्या अहवालात कर्डक यांची नियुक्ती रद्द करण्याचे अादेश दिले. महापालिकेतील या कुरघाेडीच्या राजकारणात शिवसेनेने बाजी मारल्याचे यावरून दिसते.

पंधरा दिवसांत नवीन नियुक्ती
महापाैरअशाेक मुर्तडक यांनी नियुक्तीनंतर दिलेला निर्णय शासन नियमाच्या विसंगत असल्याचा ठपका ठेवत पंधरा दिवसांत विराेधी पक्षनेतेपदासाठी नियुक्ती प्रक्रिया घेण्याचे अादेश महापालिकेला दिले अाहेत. विराेधी पक्षनेतेपदासाठी महापालिकेतील जास्त संख्याबळ असलेल्या पक्षातील सदस्याची नियुक्ती करावी, असेही स्पष्ट केले अाहे.
बातम्या आणखी आहेत...