आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन: गटबाजी विसरून शिवसेनेचे नेते येणार एकत्र

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- माजी जिल्हाप्रमुख सुनील बागुल यांच्या हकालपट्टीनंतर शिवसेनेतील पदाधिकारी एकत्र कामाला लागले असून, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची बुधवारी होणारी जयंती जल्लोषात साजरे करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जयंतीच्या पूर्वसंध्येला शहर भगवेमय झाले असून, चौकाचौकांत होर्डिंगद्वारे अभिवादन करण्यात आले आहे.

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती कार्यक्रमावर शिवसेनेतील अंतर्गत कलहाचे सावट होते. प्रतिशिवसेनेने बाळासाहेबांच्या जयंतीचे स्वतंत्र कार्यक्रम घेण्याची तयारी चालवल्यामुळे सामान्य शिवसैनिकांची कोंडी झाली होती. मात्र, कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेले कठोर निर्णय व त्यानंतर माजी जिल्हाप्रमुख सुनील बागुल, अर्र्जुन टिळे व अन्य पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादीचा रस्ता धरल्यानंतर गटबाजी संपुष्टात आली. त्यातच प्रतिशिवसेनेतील पदाधिकार्‍यांनी कारवाईचा धसका घेऊन विद्यमान जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्याशी जुळवून घेतले. त्यामुळे बुधवारी होणारा शिवसेनाप्रमुखांचा जयंतीसोहळा जोरदार साजरा करण्याची तयारी झाली आहे.