आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना कार्यकारिणीत मुखवटे नवे, पण त्यामागील चेहरे मात्र जुनेच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शिवसेनेच्या कार्यकारणीला तब्बल दीड वर्षांनंतर का होईना एकदाचे मुहूर्त मिळाले असून त्यात पक्षातील प्रस्थापितांना बाजूला सारत नव्या चेहर्‍यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य पसरले आहे.

शिवसेनेचे संपर्क नेते रवींद्र मिर्लेकर यांनी महिनाभरापूर्वीच संघटना बळकटीसाठी तरूणांना पुढे आणणार असल्याची घोषणा केली होती. ती प्रत्यक्षात उतरवली असली तरी, बहूतांशी उपमहानगरप्रमुख प्रस्थापितांचेच निकटवर्तीय असल्याने एकप्रकारे त्या जागांवर त्यांच्याऐवजी त्यांचे सर्मथक, अशीच कार्यकारिणी असल्याचे दिसून येते. गेल्या दशकभरातील शिवसेनेच्या महानगरप्रमुखापदाचा कार्यकाळ बघता देवानंद बिरारी यांच्या अडीचवर्ष कार्यकाळाचा अपवाद वगळता एकाही पदाधिकार्‍याला वर्षही पूर्ण करता आलेले नाही. वर्षभराच्या कालावधीत दोन-दोन महानगरप्रमुख बदलण्याची नामुष्की पक्षावर ओढवली होती. यामुळेच पक्षाची जिल्ह्यातील संघटनात्मक स्थिती लक्षात घेता महानगरप्रमुखाविनाच कार्यकारणी घोषित करण्यात आली. ज्या उपमहानगरप्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या, त्यांनी खरोखरच त्यांच्या भागात ओळख निर्माण केली.

16 जुलैपासून विभागनिहाय कार्यशाळा
नूतन कार्यकारणी आणि गटप्रमुख, विभागप्रमुखांना आगामी निवडणूकांच्या दृष्टीने प्रभागात संर्पक कसा वाढवायचा, नागरिकांच्या समस्या, पक्षाच्या नगरसेवकांच्या विकासकामांचा आढावा घेत त्यांची विभागनिहाय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी येत्या 16 जुलैपासून प्रारंभ होणार आहे.

आमदार घोलपांचे वर्चस्व
या कार्यकारणीत गट-तट आणि वर्षानुवर्ष पक्षात मक्तेदारी निर्माण केलेल्या पदाधिकार्‍यांना बाजूला ठेवण्यात आल्याचा दावा केला जातो आहे. तरी प्रत्यक्षात काही प्रमाणात आमदार बबनराव घोलप यांचे वर्चस्व दिसून येत आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये गेलेले शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुनील बागूल यांचे सर्मथक मानले जाणारे परंतू त्यांच्या सोबत न गेलेल्या कार्यकर्त्यांनही जाणीवपुर्वक पदे देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे एकप्रकारे पुर्नवसन करण्याचा प्रयत्न झाला आहे.

नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे
नाशिक शहर कार्यालयीन उपमहानगरप्रमुख - नीलेश कुलकर्णी, पश्चिम - शरद देवरे, पूर्व विभाग - संतोष कहार, देवळाली - सुदाम डेमसे, सिडको - बंटी उर्फ प्रविण तिदमे, पंचवटी - मल्हारी मते, नाशिकरोड - बाबा बच्छाव, तर विधानसभा मतदारसंघ प्रमुखांमध्ये देवळाली - केशव पोरजे, मध्य - महेश बडवे, पंचवटी-नाशिकरोड - दिलीप मोरे, सिडको-सातपूर - सुभाष गायधनी तर, महिला आघाडी संघटकांत मध्य नाशिकसाठी किर्ती निरगुडे, पूर्वसाठी चित्रा ढिकले, डॉ. वृषाली सोनवणे (पश्चिम), देवळालीसाठी नंदा ढोले व महिला उपसंघटक शोभा दोंदे, सुरेखा लोळगे, रिमा भोगे, पूर्वसंघटकपदी उषा गायखे, पश्चिम मतदारसंघासाठी सीमाताई बडदे, अलका गायकवाड.