आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकोपा नसल्याने मराठी पंतप्रधान नाही- मनोहर जोशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- मराठी माणूस आपसात भांडत राहतो. एकत्र राहत नाही, राहण्याची सवय नाही, त्यामुळे मराठी माणसाची पंतप्रधानपदाची संधी हुकली. एकत्र आल्यास वेगळे चित्र दिसेल. प्रादेशिक पक्षांचे सरकार असलेला महाराष्ट्र देशात पहिले राज्य ठरेल, असे सूचक उद्‍गार शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी काढले. नाशिकरोड येथे देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.

शिवसेना-मनसे ही दोन पक्ष एकत्र येण्यासाठीचे प्रयत्न अपयशी राहिले. यावर बोलताना त्यांनी दोन पक्षांत मराठी माणसांची मते विभागली जाऊन नुकसान होत असल्याची अप्रत्यक्ष कबुली दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हात पुढे केला, त्यानंतर जनतेच्या अपेक्षेनुसार भांडणे मिटवून एकत्र येतील अशी अपेक्षा होती. सर्वांना राज ठाकरे यांच्या प्रतिक्रियेची उत्सुकता होती. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद लाभला नसल्याने एकत्र येण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट होते. शिवसेनाप्रमुखांच्या हयातीत दोघांच्या एकत्रिकरणासाठी केलेला प्रयत्न अखेरचा त्यानंतर प्रयत्न केला नसल्याचे जोशी यांनी स्पष्ट केले.

नेतृत्व सिद्ध झाले
मुंबई पालिका स्वबळावर लढवून उद्धव यांनी नेतृत्व सिद्ध केले. यावरून राज काही शिकले असते तर बरे झाले असते.राज यांनी स्वबळाची घोषणा केल्याने महाराष्ट्रात वेगळे काही घडेल असे वाटत नसल्याचे ते म्हणाले.

सेनेत पुन्हा प्रवेश नाही
शिवसेनेत मोठे होऊन स्वार्थासाठी इतरत्र जातात. अशांना पुन्हा पक्षात प्रवेश देण्यात येऊ नये असा निर्णय झाल्याचे ते म्हणाले. ज्येष्ठतेनुसार मला सन्मान मिळतो. मला डावलले जात असल्याच्या अफवा असल्याचे ते म्हणाले. कार्यकारिणी निवडीचे अधिकार अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे असून लवकरच नाशिकची कार्यकारिणी व संपर्कप्रमुखांची निवड होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पक्ष सोडल्याने पश्चात्ताप
जुने सहकारी छगन भुजबळ यांची कार्यक्रमात भेट होते. शिवसेना सोडून गेलेल्यांना पश्चात्ताप होत आहे. कार्यकर्त्यांचे प्रेम फक्त सेनेत मिळते, इतर पक्षात नाही, असे ते म्हणाले. विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी भुजबळांऐवजी माझी निवड शिवसेनाप्रमुखांनी केली, असे म्हणून त्यांनी निवडीमागचे गुपित अनेक वर्षांनी काल उघड केले.