आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनतेनेच दाखविली काेरे चेक देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना जागा, कार्यकर्ता मेळावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - स्वाक्षरी केलेले काेरे धनादेश अाणि लेटरहेड देऊन विकासकामे मंजुरीचे अाश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना नगरपालिका निवडणुकीत मतदारांनीच त्यांची जागा दाखवून दिल्याची घणाघाती टीका शिवसेना नेते खासदार अनिल देसाई यांनी केली. चार वाॅर्डांचा एक प्रभाग करण्याची व्यवस्था भाजपने जाणीवपूर्वक केली असली तरी त्याचा फटका या पक्षालाच बसणार अाहे, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रभागरचनेमुळे इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने स्थानिक नेत्यांशी सलगी करून गट करू नका, असा माेलाचा सल्ला त्यांनी यावेळी इच्छुकांसह कार्यकर्त्यांना दिला.
नाशिकरोड परिसरातील इच्छामणी लाॅन्स येथे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा शनिवारी (दि. १०) जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार अनिल देसाई यांनी मुख्यमंत्री आणि भाजपवर तोफ डागली. शिवसेनाप्रमुखांचे बोट धरून जे राजकारणात चालायला शिकले, त्यांनीच अापल्या स्वार्थासाठी युती ताेडली. असे असले तरीही विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आल्याने भाजपला चांगलेच उत्तर मिळाले असल्याचे सांगत खासदार देसाई म्हणाले की, विदर्भ तोडण्याची भाषा करणाऱ्यांना शिवसैनिकांनी अंगावर केसेस घेऊन विरोध केला आहे.

सडके आंबे सेनेत घुसविण्याचा प्रयत्न
विजय करंजकर यांनी शिवसेनेतही एखाददुसरा सडका आंबा असतो. तो इतरांना खराब करतो, असे सांगितले. याचा धागा पकडत देसाई यांनी शिवसेनेत एकही सडका आंबा नाही. मात्र, विरोधक तो मुद्दाम घुसवितात, असा भाजप, राष्ट्रवादी आणि मनसेला टोला लगावला.

स्वतंत्र निवडणुकीचे स्पष्ट संकेत
राज्यात अन्यत्र पक्षप्रमुखांनी युती जरी केली तरी नाशिक जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकविण्यासाठी सज्ज राहावे, असे सांगत खासदार अनिल देसाई यांनी निवडणूक स्वतंत्रच लढविली जाणार याचे स्पष्ट संकेत दिले.
शिवसेनेच्या वतीने अायाेजित करण्यात अालेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या जिल्हा मेळाव्यात मार्गदर्शन करताना खासदार अनिल देसाई.
बातम्या आणखी आहेत...