आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena News In Marathi, Shiv Sena\'s Election Candidates List Will Be Declare In Week,Divy Marathi

सेना उमेदवाराची आठवडाभरात घोषणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्धव ठाकरे यांचे मुंबईत सूतोवाच

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेच्या उमेदवाराची स्वत: आठवडाभरात घोषणा करणार असून, दिलेल्या उमेदवाराविषयी किंतू, परंतु न करता तो निवडून आणावा, असा आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व दोघा इच्छुकांच्या उपस्थितीत मातोर्शीवरील बैठकीत त्यांनी उमेदवारी निश्चितीबाबत सूतोवाच केले.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आठवडाभरात जाहीर होण्याची शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून नाशिक लोकसभेसाठी संभाव्य उमेदवारांमध्ये नगरसेवक हेमंत गोडसे व जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्यातच स्पर्धा आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील जागांसाठी त्या-त्या जिल्ह्यातील इच्छुक आणि पदाधिकार्‍यांची मते जाणून घेण्यासाठी बैठका बोलविल्या आहेत.
याअंतर्गत नाशिकच्या जागेसाठी उमेदवाराच्या चाचपणीसाठी इच्छुकांसह आमदार बबन घोलप, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, दत्ता गायकवाड, विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, नगरसेवक विलास शिंदे, निवृत्ती जाधव, सत्यभामा गाडेकर व तालुका प्रमुख, युवासेनेच्या जिल्हाप्रमुखांशी चर्चा केली. या प्रसंगी ठाकरे यांनी उमेदवारीसाठी अंतिम शब्द आपलाच असल्याचे पुन्हा स्पष्ट करत जो उमेदवार देऊ, तो निवडून आणण्याची जबाबदारी स्वीकारा, असेही बजाविले. तसेच, करंजकर, गोडसे व घोलप यांच्याशी वैयक्तिक चर्चाही केली. यापाठोपाठ मतदारसंघातील त्रयस्थ व महत्त्वाच्या व्यक्तींशीही चर्चा करून उमेदवार जाहीर करणार असल्याचेही ते म्हणाले. पदाधिकार्‍यांनीही उमेदवार कोणताही दिला तरी निवडून आणण्याची ग्वाही दिली.