आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक परिसरातील उद्याेग विदर्भात पळविण्याच्या धाेरणाला सेनेचा विराेध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अाैद्याेगिक बिलात विदर्भाला ३० टक्क्यांपेक्षा जास्त सूट देऊन नाशिकचे उद्याेग विदर्भाकडे स्थलांतरित करण्याचा सरकारचा कट असून, धरण उशाशी असतानाही पाण्यावाचून नाशिककरांचा घसा कोरडा अाहे. यासह शहरातील विविध प्रकल्प स्थलांतरित करण्याचे सरकारचे मनसुबे उधळण्यासाठी शिवसेना शनिवारी (दि. १९) जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चाची माहिती महानगरप्रमुख अजय बाेरस्ते यांनी दिली.

नाशिकचे पाणी मराठवाड्यात गेले. जलसंपदा मंत्र्यांचा बेजबाबदारपणा नाशिककरांना भाेवला अाहे. एकलहरा वीज केंद्राचा ६६० मेगावॉटचा नवीन प्रकल्प स्थलांतरित करण्याचा घाट घातला अाहे. कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असून, वर्षभरात ७० ते ८० खून, साेनसाखळी चाेरी, दराेडे, अार्थिक फसवणुकीचे गुन्हे वाढले अाहेत. ७.५ मीटर रुंद रस्त्यांवरील छाेट्या प्लाॅटवर यापुढे टीडीअार वापरता येणार नाही. त्यामुळे नाशिककरांच्या घरांच्या स्वप्नाला तडे जाणार अाहेत. अाराेग्य विज्ञान विद्यापीठाचे विभाजन करून त्यातील हाेमिअाेपॅथी अायुर्वेद विभाग नागपूरला हलविण्याचा डाव मांडला जात आहे, केंद्राचा नॅशनल इन्स्टिट्यूट अाॅफ फार्मास्युटिकल अँड रिसर्च सेंटर उपक्रम नाशिकला हाेणे सहज शक्य असताना जागा नसल्याचे कारण देत त्यासाठी नागपूरची शिफारस केली अाहे. अशा अनेक मुद्यांवर जनजागृती केली जात अाहे. सातपूर विभागासाठी नगरसेवक विलास शिंदे यांच्या कार्यालयात शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन माेर्चाचे नियाेजन करण्यात अाले.

हाेर्डिंगद्वारे शिवसेनेचे भाजपवर शरसंधान
राज्यातील सत्तेत सहभागी शिवसेनेने सहकारी भाजपवर हाेर्डिंगद्वारे जाेरदार फटकारे मारले अाहेत. शनिवारी हाेणाऱ्या माेर्चानिमित्त हे हाेर्डिंग लावले असून, त्यात ढासळती कायदा सुव्यवस्था नव्या टीडीआर धोरणावरून मुख्यमंत्री, गंगापूरचे पाणी मराठवाड्यासाठी सोडल्यावरून जलसंपदा तथा पालकमंत्री, मराठवाडा-विदर्भातील उद्योगांना विशेष वीजदरात सवलत देणारे ऊर्जामंत्री, आरोग्य विद्यापीठाचे विभाजन करून ते नागपूरला स्थलांतरित करण्याच्या कथित मुद्यावरून वैद्यकीय शिक्षणमंत्री मुख्यमंत्री अशा भाजपच्या प्रमुख नेत्यांवर शरसंधान साधेले आहे. त्यासाठी व्यंगचित्रे वापरली अाहेत. साेशल मीडियावरही शिवसैनिक ही चित्रे पाठवित अाहेत.

कामगारांची उपासमार
वेगळ्या विदर्भासाठीची ही व्यूहरचना असून, शासनाच्या या धाेरणामुळे नाशिकमधील २६ हजार कामगार शेतकरी उद‌ध्वस्त हाेऊ शकतात. त्यामुळे सातपूर विभागातून कामगार शेतकरी माेठ्या संख्येने माेर्चात सहभागी हाेणार अाहेत. विलास शिंदे, नगरसेवक

सेना सरकार जमा नाही
सरकारमध्ये सहभागी शिवसेना सरकारजमा झालेली नाही. सरकार कुणाचेही असाे, जनतेबाबत अन्यायकारक भूमिका घेणाऱ्यांची शिवसेना गय करत नाही. सरकारला जाब विचारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक माेर्चाचे अायाेजन करण्यात अाले अाहे. अजय बाेरस्ते, महानगरप्रमुख
बातम्या आणखी आहेत...