आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेची तिरकी चाल, भांडण भुजबळ यांच्या पथ्यावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महाराष्ट्र सदन घाेटाळ्यात छगन भुजबळ मराठी अधिकाऱ्यांना हकनाक गाेवण्याविराेधात शिवसेनेने दंड थाेपटून भाजपला काटशह देण्याचा प्रयत्न चालविला असून, ही सर्व परिस्थिती अडचणीच्या कालावधीतून वाटचाल करणाऱ्या भुजबळ यांच्याही पथ्यावर पडत असल्याचे चित्र अाहे. ‘भुजबल अाैर बुद्धिबल का मेल जमाअाे’ असे सांगत मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनीच प्रसंगी भुजबळ गटाच्या माध्यमातून राज्यातील सत्तेचे तारू टिकवण्याचा मंत्र दिला हाेता. नेमकी हीच बाब हेरून शिवसेनेने हा डाव टाकला असला तरी, तूर्तास ‘दिव्य मराठी’शी बाेलताना शरद पवार यांची साथ साेडणार नसल्याचे सांगत संभाव्य राजकीय वादळावर भुजबळ यांनीच पडदा टाकला अाहे.

महाराष्ट्र सदन घाेटाळ्यावरून भुजबळ यांच्यामागे सध्या चाैकशांचे शुक्लकाष्ट लागले असल्याच्या निमित्ताने अलीकडेच भुजबळ यांना क्लिन चीट देणारे पत्र पाठवून शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मित्रपक्ष भाजपला धक्का देण्याचा पहिला अंक सुरू केला. मात्र, या अंकाचे अनेक भाग अाता चर्चेत अाले अाहेत. भुजबळ यांचा सध्या प्रथम क्रमांकाचा शत्रू भाजप असल्याचेसर्वश्रूत असून, सत्तेत बसून काेंडी झाल्यामुळे शिवसेनाही भाजपवर कुरघाेडीची संधी शाेधत अाहे. त्यातच परिस्थितीची गरज म्हणून भुजबळ यांना अाळवण्याचा शिवसेनेचा हा प्रयत्न असावा, असा जाणकारांचा तर्क अाहे. कारण, अागामी दहा माेठ्या महापालिका निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना सामना अटळ अाहे. भविष्याची रणनीती म्हणून उद्धव यांना भुजबळ यांच्यासारख्या जुन्या नेत्याची अावश्यकता भासू शकेल. शिवसेनेच्याच मुशीत तयार झालेल्या भुजबळ यांनाही शिवसेनेचा पर्याय प्रभावी वाटू शकेल. त्याप्रमाणे अाेबीसी नेतृत्व म्हणूनही शिवसेनेला ते फायदेशीर ठरेल. भविष्यात सत्तेतून शिवसेना बाहेर पडल्यास भाजपला सहजासहजी भुजबळ समर्थक अामदारांची रसद मिळू नये अशीही तजवीज करण्याचा त्यामागचा उद्देश असल्याचे बाेलले जाते. शिवाय, भुजबळ यांच्या रूपाने एक माेठा गट शिवसेनेकडे अाल्यास संख्याबळ वाढेल भविष्यात स्वबळावर लढताना जिल्हापातळीवर त्याचा फायदा हाेईल. याबराेबरच त्यांच्या समता परिषदेची अायतीच व्हाेट बँकही उपलब्ध हाेईल असा‘ विन विन’ धरतीवरचा हा विचार असल्याचे समजते.

दरम्यान, राज्यात प्रशासन विरुद्ध भाजप असा सुप्त संघर्ष सुरू असून, मध्यंतरी भाजपच्या मंत्र्यांनी अधिकारी एेकत नसल्याची खंत व्यक्त केली हाेती. या पार्श्वभूमीवर भुजबळ यांच्यानिमित्ताने मराठी अधिकाऱ्यांनाही साद घालण्याचा शिवसेनेचा प्रयत्न ध्वनित हाेत असून, संजय राऊत यांच्या अधिकाऱ्यांना क्लिन चीट देणाऱ्या पत्राचा संदर्भ त्यासाठीच दिला जात अाहे.