आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध संस्था, संघटनांतर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. अत्यंत साधेपणाने आयोजित कार्यक्रमांमध्ये त्यांच्या आठवणींना उजाळा देताना अनेकांच्या डोळ्यांचे काठ पुन्हा एकदा पाणावले होते. बाळासाहेबांची आठवण आजही मनात तितकीच ताजी असल्याचे मत या वेळी व्यक्त करत त्यांनी दाखवलेल्या मार्गावर कायम चालत राहू अशी ग्वाहीही मान्यवरांनी दिली.
महापालिकेत अभिवादन
नाशिक महापालिकेत बाळासाहेबांच्या प्रतिमेला महापौर अँड. यतिन वाघ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. स्थायी समिती सभापती उद्धव निमसे, उपायुक्त हरिभाऊ फडोळ, डी. टी. गोतिसे, विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, शिवसेना गटनेते अजय बोरस्ते, नगरसेवक शिवाजी सहाणे, विनायक पांडे, डी. जी. सूर्यवंशी, राजेंद्र देसाई, डॉ. सचिन हिरे, अनिल महाजन, एन. जी. आगरकर, योगेश कमोद आदींची या वेळी उपस्थिती होती.
सेनाप्रमुखांना नमन
आडगाव येथील मारुती मंदिरात शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नगरसेवक बालाजी माळोदे, निवृत्ती मते, जालिंदर शिंदे, संदीप लभडे, सुनील जाधव, संजय शिंदे, सचिन देशमुख, सुचित मोगल, सद्दाम सय्यद, खलील सय्यद आदींची या वेळी उपस्थिती होती.
सिडकोत प्रतिमापूजन
सिडको- सिडकोत विविध ठिकाणी शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. मोरवाडी येथे र्शीकांत सोनवणे यांनी ‘हिंदू रक्षक दिनाच्या’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डी. जी. सूर्यवंशी, अजय बोरस्ते, शैलेश ढगे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी र्शीकांत सोनवणे, सोमनाथ तडाखे, किरण घुगे, समाधान जाधव आदींनी पर्शिम घेतले.
पाथर्डीत विविध कार्यक्रम
इंदिरानगर- शिवसेनेचे माजी उपशहरप्रमुख सुदाम डेमसे यांच्या हस्ते पाथर्डीफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पाथर्डीतील हनुमान मंदिर सभागृहातही बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. डेमसे यांच्यातर्फे वाडीचे रान, पाथर्डी गाव तसेच पाथर्डी फाटा येथील महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करण्यात आली.
मॉँ साहेब जिजाऊ वाचनालय
शिवसेवा युवक मित्रमंडळ व मॉँ साहेब जिजाऊ वाचनालयातर्फे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष संतोष ठाकूर, रघुअप्पा वाबळे, रतीलाल गिल्डा, ऋतुराज पांडे, सुबोध देशपांडे, गोरख पाटील, भगवान पुरे, राजेंद्र भुजबळ, दीपक चौघुले उपस्थित होते.
हिंदी विद्यालयात ग्रंथदान सोहळा
राणेनगर येथील क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या हिंदी माध्यमिक विद्यालयास बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त माणिकराव सोनवणे यांनी सहा हजारांचे ग्रंथ भेट दिले. या वेळी 100 विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. वंदना बिरारी, कल्पना पांडे, माणिकराव सोनवणे, दीपक केदार, आर. पी. गायकवाड, मीना सांगळे यांची या वेळी उपस्थिती होती. सूत्रसंचालन मीनाक्षी खाडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पी. पी. सानप, रामदास खैरनार, नयना आव्हाड यांनी परिश्रम घेतले.
रक्तदान शिबिर
प्रभाग क्रमांक 13 मध्ये शिवसेनेच्या पप्पू टिळे, सचिन कुलकर्णी, श्याम कंगले यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या वेळी नीलेश कु लकर्णी, दीपक आढाव, संतोष वाडेकर, गणेश चौघुले, योगेश तुरे, स्वप्निल गिते आदींची उपस्थिती होती.
पेठरोडला भव्य देखावा
पंचवटीतील पेठरोडवरील भराडवाडी शिवसेना शाखेतर्फे शिवसेनाप्रमुखांचे भव्य पोस्टर लावण्यात आले होते. याप्रसंगी संजय थोरवे, नीलेश मोरे, शैलेश सूर्यवंशी, महेंद्र बडवे, संतोष पेलमहाले, नाना अपसुंदे, सचिन चौघुले, संतोष सावंत, राहुल जाधव, शरद चव्हाण यांच्यासह शिवसैनिकांनी सेनाप्रमुखांना अभिवादन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.