आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Will Take Report Of BJP In Its Meeting

शिवसेनेच्या बैठकीत भाजपचा समाचार, उत्तर महाराष्ट्र कार्यकर्ता मेळावा २४ एप्रिलला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांसह त्यांची संपूर्ण टीम नाशिकमध्ये येऊन गेली. मात्र, नाशिककरांच्या हाती काहीही लागले नाही. त्यामुळे नाशिककरांवरील अन्याय दूर करण्यासाठी शिवसैनिकांनी एल्गार पुकारण्याचे अावाहन शिवसेनेचे संपर्कप्रमुख अजय चाैधरी यांनी केले. अागामी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेचाच बाेलबाला निर्माण करण्यासाठी येत्या २४ एप्रिल राेजी उत्तर महाराष्ट्र कार्यकर्ता मेळावा घेण्यात येणार असल्याची घाेषणाही त्यांनी केली.

अागामी महापालिकेची निवडणूक एकटे लढण्याची तयारी करा, असे स्पष्ट अादेश देत युतीभंगाची सूचना शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना दिल्यामुळे अाता सेनेने भाजपला जशास तसे उत्तर देण्याचे धाेरण स्वीकारले अाहे. भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला उत्तर देण्यासाठी सेना अाता उत्तर महाराष्ट्र कार्यकर्ता मेळावा घेण्याचे नियाेजन करीत असून, यावर विचारविनिमय करण्यासाठी मंगळवारी शिवसेना कार्यालयात पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे अायाेजन करण्यात अाले हाेते. यावेळी पक्षाचे अजय चाैधरी यांनी शिवसैनिकांना संबाेधित करताना विकासाच्या मुद्यांवर अधिकाधिक अाक्रमक पद्धतीने अांदाेलन करण्याचे अावाहन केले. नाशिक अाता राजकीय घडामाेडींचे केंद्रबिंदू झाले अाहे, असे सांगत चाैधरी म्हणाले की, महापालिका निवडणुकीला अाता केवळ २०० दिवस शिल्लक अाहेत. त्यामुळे शहराच्या दृष्टीने विधायक ठरणाऱ्या प्रश्नांवर अांदाेलने करण्याची अधिक गरज अाहे. महापालिकेवर भगवा फडकविल्याशिवाय मी राहणार नाही. भगवा फडकल्यास या नाशिकमध्ये पुन्हा पायसुद्धा ठेवणार नाही. सेनेचे पदाधिकारीदेखील तन, मन, धनाने निवडणुकीच्या तयारीला लागले असून, त्यांना शिवसैनिकांची सक्षम साथ मिळणे अावश्यक अाहे. उत्तर महाराष्ट्र मेळाव्याच्या निमित्ताने निवडणुकीच्या प्रचाराचे जणू नारळ फुटणार अाहे. हा मेळावा शक्तिप्रदर्शन करणाराच ठरावा, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी उपनेते बबन घाेलप, खासदार हेमंत गाेडसे, महानगरप्रमुख अजय बाेरस्ते, माजी महापाैर विनायक पांडे, अॅड. यतिन वाघ, नगरसेवक विनायक खैरे, विलास शिंदे, शिवाजी सहाणे, डी. जी. सूर्यवंशी, राजू लवटे, महिला पदाधिकारी सत्यभामा गाडेकर, अॅड. श्यामला दीक्षित अादी उपस्थित हाेते.

पालिकेवर भगवा फडकेल : भाजपशिवसेनेला संपवायला निघाली असल्याने अागामी निवडणुकीत शिवसेनेला भाजपशीच दाेन हात करावे लागणार अाहेत, असे उद्धव ठाकरे यांनी रविवारी मुंबईतील बैठकीत सांगितले अाहे. त्यामुळे सेनेने अाता भाजप विराेधात रणनीती तयार करायला प्रारंभ केला अाहे. महापालिकेच्या अागामी निवडणुकीत भगवा फडकविण्यासाठी सेनेने वातावरण निर्मितीही सुरू केली अाहे. त्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये स्फुलिंग चेतविणे गरजेचे ठरणार अाहे. दुसरीकडे नाशिकमध्ये झालेल्या भाजप राज्य कार्यकारिणी बैठकीत नाशिकच्या मुद्यांची दखल फारशी घेतल्याने अाणि शिवसेनेला अनुल्लेखाने मारा, असा कानमंत्र वरिष्ठांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिल्याने शिवसैनिक भाजपविराेधात पेटून उठले अाहे.