आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झाेपडपट्ट्यांतील तीन लाख मतांवर शिवसेनेचा डाेळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राज्यातसत्ता आल्यानंतर प्रफुल्लित झालेल्या शिवसेनेने महापालिकेच्या ‘मिशन २०१७’च्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शाखाप्रमुखांच्या धर्तीवर शहरातील झोपडपट्टीनिहाय स्वतंत्र प्रमुख नेमले जातील. याबरोबरच शहरातील महत्त्वाच्या भागांमध्ये सक्षम महिला नेतृत्व घडवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असून, एकूणच विचार केला, तर झोपडपट्ट्यांतील तीन लाख मतांबराेबरच महिला व्होट बँक मजबूत करण्याचा प्रयत्न राहणार आहे.

दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या दाेन नगरसेवकांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश झाला. या वेळी नाशिकच्या बालेकिल्ल्यावर शिवसेनेचा भगवा पुन्हा फडकवण्यासाठी ठाकरे यांनी पदाधिका-यांनी काही महत्त्वाच्या ‘टिप्स’ दिल्या. खासकरून तळाकडील संघटन मजबूतीवर भर देण्याची याेजना राबवली जाईल. नाशिकचा विचार केला, तर १५ लाख लाेकसंख्येत जवळपास तीन लाख मते झाेपडपट्ट्यांत आहेत. या वर्गाकडे केवळ िनवडणुका आल्या की, सर्वच राजकीय पक्षांचा आेढा असताे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने या कायमस्वरूपी व्हाेट बँकेवर पकड मिळविण्यासाठी येथे पक्षाचे स्वतंत्र पदाधिकारी नेमण्याचा निर्णय घेतला आहे. हे पदाधिकारी झाेपडपट्टीधारकांचे प्रश्न, समस्या शिवसेनेच्या व्यासपीठातून साेडवतील, असेही अपेक्षित आहे. याव्यतिरिक्त शहरातील उच्च मध्यमवर्गीय वस्तीत चांगल्या महिलांकडे नेतृत्व साेपवले जाणार असून, त्यातून महिला व्हाेट बँक वाढवण्याचा प्रयत्न असेल.

शाखाप्रमुखांना देणार बळ : शिवसेनेच्या शाखाप्रमुखांना सध्या फारसे महत्त्व नाही. मुंबईत मात्र शिवसेनेच्या शाखाप्रमुखांवर नगरसेवकापेक्षाही अधिक जबाबदारी असते. या पार्श्वभूमीवर तळाकडील शाखाप्रमुखांना अधिकार देऊन संघटनवाढीसाठी त्यांचा उपयाेग करून घेण्याचीही याेजना आहे.

ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘उत्तर महाराष्ट्र मेळावा’: उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्र कार्यकर्ता मेळावा नाशिकमध्ये हाेण्याची शक्यता आहे. त्यासाठी अद्याप वेळ निश्चित झाली नसली, तरी लवकरच त्याबाबत निर्णय हाेण्याची शक्यता महानगरप्रमुख अजय बाेरस्ते यांनी व्यक्त केली.


मजुरांसाठीही सेल...
प्रत्येकक्षेत्रात मुसंडी मारण्यासाठी शिवसेना पुढाकार घेणार असून, अगदी दगड-वीट वाहणा-या मजुरांसाठीही शिवसेनेचा सेल असेल. आैद्याेगिक वसाहतींत शिवसेनेचा सेल उघडला जाणार असून, लवकरच त्याचे उद‌्घाटन हेाणार आहे.

प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न
तळागाळातीलप्रत्येक घटकापर्यंत शिवसेना पाेहोचणार आहे. ‘मिशन २०१७’च्या मागे केवळ सत्ता मिळवणे हाच हेतू नसून, प्रत्येक घटकातील लाेकांच्या समस्या साेडवणे चांगले नेतृत्व निर्माण करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनेक याेजना सुचवल्या आहेत. त्यांची योग्य रीतीने अंमलबजावणीदेखील आगामी काळात हाेईल. अजयबाेरस्ते, महानगरप्रमुख शिवसेना