आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवरायांनी केले प्रत्येक घटनेचे अचूक नियाेजन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - स्वराज्याच्या निर्मितीपासून प्रत्येक घटनेचे शिवाजी महाराजांनी काटेकाेर नियाेजन केले हाेते. त्यामुळेच त्यांच्या संपूर्ण अायुष्यात एकही चूक शाेधून सापडत नाही. स्वराज्याची निर्मिती करतानाच ते स्वयंपूर्ण करण्यासह प्रत्येक हाताला काम देऊन स्वराज्य बळकट करण्याचा उद्याेजकीय दृष्टिकाेनदेखील महाराजांमध्ये हाेता, हे अनेक प्रसंगांमधून अापल्याला दिसते, असे प्रतिपादन प्रख्यात शिवचरित्र व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी केले.

वनबंधू परिषदेच्या नाशिक चॅप्टरच्या वर्धापन दिनानिमित्त अायाेजित कार्यक्रमात ते 'शिवाजी महाराजांची उद्याेजकीय दृष्टी अाणि व्यवस्थापन काैशल्य' या विषयावर बाेलत हाेते. यावेळी बाेलताना प्रा. बानगुडे पाटील यांनी शिवरायांनी त्यांच्या राज्याला शिवराज्य असे नाव देता स्वराज्य असे नाव देण्यामागेदेखील माेठी कल्पकता अाहे. हे राज्य प्रत्येकाला अापले वाटले पाहिजे अाणि ते घडविण्यात अापले याेगदान द्यावेसे वाटावे म्हणूनच ते स्वराज्य हाेते.

भविष्यात समुद्रावरून येणारा शत्रू अधिक घातक हे अाेळखून अारमार उभे करणारे शिवाजी महाराज हे सम्राट चंद्रगुप्तांनंतरचे केवळ दुसरे राजे हाेते. प्रत्येक बलुतेदाराच्या हाताला काम मिळेल अशी तजवीजदेखील त्यांनी केली हाेती. प्रत्येक कामासाठी विशिष्ट काैशल्य असलेला माणूस, प्रत्येक कामासाठी वेगळे तंत्र, वेगळी याेजना, वेगळे नियाेजन असे त्यांनी अत्यंत नियाेजनबद्धपणे काम केले. त्यामुळे त्यांच्या शाैर्याबराेबरच त्यांच्या व्यवस्थापन उद्याेजकीय दृष्टीच्या प्रसंगांचा समावेश शालेय इतिहासात करण्याची गरज असल्याचेही प्रा. बानगुडे पाटील यांंनी सांगितले. या साेहळ्याप्रसंगी रामरतन करवा, नेमीचंद पाेद्दार, प्रदीप बुब, अशाेक तापडिया, सुनील चांडक, संजय मुंदडा, अाेमप्रकाश जाजू, प्रकाश लढ्ढा, अविनाश अाव्हाड, राजाराम भांगडिया, अनिल मेहता, शिल्पा मेहता, संजय लाेंढे, हरीश मंगनानी, छाया बैजल अादी पदाधिकारी उपस्थित हाेते.

नियाेजन वर्षभराचे :
अफजलखानाचाकाेथळा बाहेर काढण्यासाठी महाराजांना दाेन मिनिटांचाच वेळ लागला, मात्र त्यासाठी अफजलखान माेहिमेवर निघाल्यापासून वर्षभर महाराजांनी प्रत्येक गाेष्टीचे नियाेजन केलेले हाेते. शे-दीडशे मावळ्यांसह शाहीस्तेखानाच्या सव्वा लाखाच्या फाैजेला पळता भुई थाेडी करणारा सर्जिकल स्ट्राइक हा नियाेजनाचा अत्यंत अनाेखा अाविष्कार अाहे.

सुरतमध्ये सुरू केला पहिला छापखाना
महाराजांनी सुरतेची लूट केली त्यावेळी तेथील जडजवाहिराची लयलूट सुरू असतानाच शिवरायांची चाैकस नजर एका यंत्रावर पडली. मात्र, ते कसले ते ब्रिटिश सांगेनात. त्यावेळी शिवरायांनी ते यंत्र सुरतमधीलच भीमजी पारेख यांना देऊन ते चालवण्याचे तंत्र अात्मसात करण्यास सांगितले. त्यानंतर त्या व्यक्तीने सुरतेत एतद्देशीयाचा पहिला छापखाना सुरू केला, ताे श्री शिवाजी छापखाना अाजही दाखवला जाताे, इतकी उद्याेजकीय दृष्टी शिवाजी महाराजांकडे हाेती, असेही पाटील म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...