आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवाजी उद्यानासाठी पालिकेची विनवणी, देखभालीच्या अावाहनास प्रतिसाद मिळाल्याने जाणार उद्याेजकांच्या दारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सीबीएसचौकातील छत्रपती शिवाजी उद्यान अर्थात ब्रिटिशकालीन जॅक्सन गार्डनचा कायापालट करण्यासाठी महापालिकेने अावाहन करून जवळपास दाेन महिने उलटत अाले तरी एकाही दानशुराने संपर्कच साधला नसल्याचे वृत्त अाहे. त्यामुळे अाता शहरातील माेठे उद्याेजक, बिल्डर, संस्थांकडे जाऊन शिवाजी उद्यानाचे मार्केटिंग करण्याचा निर्णय उद्यान विभागाने घेतला अाहे.
१९८० च्या सुमारास या उद्यानात मुंबईतील राणीच्या बागेच्या धर्तीवर वाघ, सिंह आबालवृद्धांचे आकर्षण होते. मात्र, कालांतराने या उद्यानाकडे दुर्लक्ष हाेऊन त्याची दुरवस्था झाली. कुंपण तुटून पडले, खेळण्या माेडल्या, या ठिकाणी संगीतावर चालणारे कारंजेही बंद पडले, अाकर्षणाचे केंद्र ठरलेले मत्स्यालयही बंद पडले. तीन एकरावरील या उद्यानाची देखभाल महापालिकेला परवडत नसल्यामुळे एप्रिलमध्ये ‘एक्स्प्रेस अाॅफ इंटरेस्ट’ची नाेटीस काढून इच्छुक संस्था, दानशुरांनी शिवाजी उद्यानासाठी पुढे यावे असे अावाहन करण्यात अाले हाेते; मात्र त्याला दाेन महिने झाल्यानंतरही काेणाचा प्रतिसाद लाभलेला नाही. अखेर महापालिकेने अाता माेठ्या उद्याेजकांकडे जाऊन देखभालीसाठी अावाहन करण्याचा निर्णय घेतला अाहे. खासगी संस्थेने उद्यानाचे नूतनीकरण केल्यानंतर येथील खेळण्यांसाठी किरकाेळ तिकीट अाकारले जाणार अाहे. जेणेकरून, त्यातून संबंधित संस्थेला खेळण्यांची देखभाल करता येईल, असे महापालिकेच्या वतीने सांगितले जात अाहे.

महिंद्राबाबत संभ्रमावस्था...
राज ठाकरे यांनी अानंद महिंद्रा यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हाेकार दिल्याचे सांगितले हाेते. मात्र, नंतर महिंद्राने प्रतिसाद दिल्याने अन्य इच्छुकांचा शाेध घेतला जात अाहे. सूत्रांनुसार, उद्यान चालवण्यासाठी इच्छुक संस्थांची अार्थिक पत तपासणी, नफा-ताेट्याचा ताळेबंदही तपासण्याच्या अटीमुळे पाठ फिरवली जात अाहे.

असा अाहे इतिहास
स्वातंत्र्यपूर्व काळात हुतात्मा अनंत कान्हेरे यांनी तत्कालीन कलेक्टर जॅक्सन यांची हत्या केली होती. जॅक्सन नाशिकचे कलेक्टर असताना त्यांच्याकडे रावबहाद्दूर हर्डीकर यांनी शिवाजी उद्यानाची जागा हस्तांतरित केली होती. जॅक्सनच्या मृत्यूनंतर ही जागा त्यांच्या पत्नीला दिली. मात्र, मायदेशी परत जात असल्यामुळे त्यांनी ही जागा उद्यानासाठी दिली. शहरातील पहिले उद्यान म्हणून जॅक्सन गार्डनची स्थापना करण्यात अाली.

जुलैमध्ये राज शहरात
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे तब्बल दाेन महिन्यांच्या कालावधीनंतर शहरात येणार असून ७, जुलै राेजी ते गाेदापार्क, बाॅटनिकल गार्डन अन्य महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा अाढावा घेणार अाहेत. त्यानंतर १५ १६ जुलैला गाेदापार्क, बाॅटनिकल गार्डनसह काही रस्तेकामांचा लाेकार्पण साेहळा त्यांच्या हस्ते हाेणार अाहे. अागामी महापालिका निवडणूक लक्षात घेता मनसेच्या प्रचाराची सुरुवातच या माध्यमातून हाेणार असल्याचे मानले जात अाहे.
बातम्या आणखी आहेत...