आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ज्येष्ठ चित्रकार शिवाजीराव तुपे यांचे निधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - ज्येष्ठ चित्रकार शिवाजीराव तुपे (79) यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. मेंदूविकारामुळे (ब्रेन हॅमरेज) काही दिवसांपासून ते रुग्णालयात होते.


लहानपणापासूनच तुपे यांना चित्रकलेची आवड होती. वडिलांकडून त्यांना हा वारसा मिळाला. जलरंगातील लॅँडस्केप्स आणि स्केचेस ही त्यांची खास वैशिष्ट्ये होती. 50 वर्षांहून अधिक काळ ते लॅँडस्केप्स काढत होते. तुपे अविवाहित होते. त्यांच्या पश्चात बंधू अनिल तुपे, भावजय, तीन बहिणी व पुतणे असा परिवार आहे. तुपे यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. तैलचित्रांचा राजा हरपला.