आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिककरांना शिवछत्रपती पुरस्काराचे ‘सप्तक’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- राज्य सरकारने तीन वर्षांच्या कालावधीनंतर जाहीर केलेल्या शिवछत्रपती पुरस्कारांमध्ये नाशिकच्या सात जणांचा समावेश आहे. या पुरस्कारार्थींमध्ये नाशिकचे चार क्रीडापटू, एक संघटक, एक मार्गदर्शक, एक जीवनगौरव आणि अन्य तीन पुरस्कारांचा समावेश आहे.


फेब्रुवारी महिन्यात या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. तीन क्रीडापटूंमध्ये अजिंक्य दुधारे व स्नेहल विधाते हे दोघे तलवारबाजीपटू, तर वैशाली तांबे या नौकानयनपटूंचाही समावेश आहे. शासनाने निदान यंदाच्या वर्षापासून तरी हे पुरस्कार नियमितपणे देण्याचे धोरण ठेवावे, अशी अपेक्षा क्रीडा वतरुळातून व्यक्त करण्यात आली. नाशिककरांच्या अभिमानास्पद कामगिरीचा यानिमित्ताने घेतलेला हा गौरवपूर्ण आढावा.

नाशिकला यापूर्वी मिळालेले शिवछत्रपती पुरस्कार
व्हॉलीबॉल : सुशम प्रधान, श्याम सारंग, नसरन अफरोज, राजेश गायकवाड
कबड्डी : अनुराधा डोणगावकर, भक्ती कुलकर्णी, निर्मला भोई
तलवारबाजी : नीलेश गुरुळे, योगेश पटेल, र्शद्धा वायदंडे, र्शुती वायदंडे, श्वेता चंडालिया, ज्ञानेश्वर निगळ,

तुनजा पटेल
सायकलिंग : लहानू जाधव
क्रीडा संघटक : पंडितराव बोरस्ते, दादासाहेब वाघचौरे, दौलतराव शिंदे, नरेंद्र छाजेड, अशोक दुधारे, गोरखनाथ बलकवडे, भीष्मराज बाम, साहेबराव पाटील
प्रशिक्षक : शैलजा जैन (कबड्डी)

वैशाली तांबे
(खेळ - नौकानयन, खेळाडू म्हणून शिवछत्रपती पुरस्कार)
विशेष प्रावीण्य : नौकानयन या क्रीडाप्रकारात कॉक्सलेस फोरस आणि कॉक्सलेस पेअरमध्ये नैपुण्य प्राप्त. आंतरराष्ट्रीय स्तरावर एक रौप्यपदक पटकावले असून, राज्यस्तरावरील स्पर्धांमध्ये 5 सुवर्ण तर 1 रौप्यपदक पटकावले आहे.
यांचे लाभले मार्गदर्शन : वैशालीचे काका अंबादास तांबे आणि अविनाश देशमुख यांचे तिला मार्गदर्शन लाभले. बालपणापासूनच लाभलेल्या मार्गदर्शनाचा तिला फायदा झाला.
इतर छंद : लहानपणी अँथलेटिक्स स्पर्धांमध्ये सहभाग तसेच वाचन आणि सामाजिक कार्याचीदेखील वैशालीला आवड आहे.

अजिंक्य दुधारे
(खेळ : तलवारबाजी) बालपणापासूनच तलवारबाजीचे प्रशिक्षण घेतानाच एमपीएडपर्यंतचे शिक्षणही विशेष प्रावीण्यासह पूर्ण केले.
विशेष प्रावीण्य : तलवारबाजीच्या इपी आणि फॉइल प्रकारात विशेष कामगिरी बजावली आहे. ऑस्ट्रेलियातील कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर 4 रौप्य आणि 4 कांस्यपदके. शालेय राष्ट्रीय स्पर्धेत 1 सुवर्णपदकासह 3 रौप्यपदके. तसेच राष्ट्रीय विद्यापीठीय स्पर्धेत 11 सुवर्णदके आणि 2 रौप्यपदके.
यांचे लाभले मार्गदर्शन : अजिंक्यचे वडील अशोक दुधारे तसेच नाशिकचे दुसरे प्रशिक्षक राजू शिंदे यांचे मार्गदर्शन त्याला लाभले.
इतर छंद : तलवारबाजीशिवाय क्रिकेट, सॉफ्टबॉल आणि बेसबॉलचीदेखील अजिंक्यला आवड असून, छंद म्हणून हे अन्य खेळदेखील तो खेळतो.

स्नेहल विधाते
(खेळ : तलवारबाजी, खेळाडू म्हणून शिवछत्रपती पुरस्कार) कॉर्मसमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करतानाच आठवीपासूनच तलवारबाजी प्रशिक्षण सुरू केले. राष्ट्रीय स्तरापर्यंत धडक मारूनदेखील ती सध्या एलएलबीच्या प्रथम वर्ष वर्गात शिक्षण घेत आहे.
विशेष प्रावीण्य : तलवारबाजीच्या सायबर या क्रीडा प्रकारात विशेष कौशल्य प्राप्त करीत आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत 3 , राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत 17 तर राज्यस्तरावरील स्पर्धेत 47 पदकांची कमाई केली आहे. त्यात 2010 साली झालेल्या दक्षिण आशियाई तलवारबाजीत 1 रौप्य व 1 कांस्यपदकाचाही समावेश आहे.
यांचे लाभले मार्गदर्शन : शाळेत सरोजिनी तारापूरकर, सप्रे, वैशंपायन, तसेच प्रशिक्षक म्हणून अशोक दुधारे, राजू शिंदे.
इतर छंद : तलवार चालवतानाच चित्रकलेचा ब्रश चालविण्याचाही तिला छंद आहे.

भीष्मराज बाम :
(क्रीडामानसोपचारतज्ज्ञ म्हणून अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंना मार्गदर्शन, शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार)
विशेष प्रावीण्य : तसेच प्रेरणादायी मार्गदर्शक, तणाव नियोजन, व्यक्तिमत्त्व विकासक म्हणून कार्यरत असणारे बाम सर हे निवृत्त पोलिस महासंचालक आहेत. ते पोलिस दलात असताना राष्ट्रपती पदकाने सन्मानित असून, क्रीडा मानसोपचार संघटनेच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित आहेत.


प्रशिक्षक म्हणून कामगिरी : क्रीडा मानस समुपदेशक म्हणून प्रख्यात फलंदाज राहुल द्रविड, ऑलिम्पिक पदकप्राप्त नेमबाज गगन नारंग अंजली भागवत, गीत सेठी, पी. गोपीचंद, रंजन सोढी, अपर्णा पोपट, गौरव नाटेकर, हर्षा मंकड यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंना मार्गदर्शन. तसेच मार्ग यशाचा, मना सज्जना, विजयाचे मानसशास्त्र या मराठी पुस्तकांसह विनिंग हॅबीटस हे इंग्रजी पुस्तकदेखील प्रकाशित झाले आहे.

अशोक दुधारे
(तलवारबाजी खेळात योगदान, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक म्हणून शिवछत्रपती पुरस्कार)
विशेष प्रावीण्य : तलवारबाजीचे एनआयएस कोच, आयओसी फेन्सिंगचे सेकंड ऑफिसर तसेच तलवारबाजीचा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक सॉलिडेटरी कोर्स केला आहे.
प्रशिक्षक म्हणून कामगिरी : त्यांनी मार्गदर्शन केलेल्या 7 तलवारबाजीपटूंना शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच अन्य 7 खेळाडूंना जिल्हास्तरावरील पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्याशिवाय भारतीय संघासोबत अनेक देशांमध्ये मार्गदर्शक किंवा व्यवस्थापक म्हणून कामगिरी बजावली आहे.

तुषार प्रभाकर माळोदे :
(खेळ : ज्यूदो)
1996 साली शालेय शिक्षक पी. एफ. सोनवणे यांनी माळोदेंना ज्यूदोच्या प्रशिक्षणासाठी पाठवले. तेव्हापासून महाविद्यालयीन शिक्षणात बी.ए. ही पदवी संपादन करीत तब्बल 18 वर्षे माळोदे हे दररोज ज्यूदोचे प्रशिक्षण घेत आहेत.
विशेष प्रावीण्य : ज्यूदोमध्ये ‘सेकंड डिग्री ब्लॅकबेल्ट’ प्रशिक्षण घेतले आहे. 16 वर्षांपासून राज्यस्तरावरील ज्यूदो स्पर्धेत सहभाग तर तब्बल 10 वर्षांपासून सतत सुवर्णपदकाचे मानकरी. 7 वर्षांपासून सीनिअर राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला असून, त्यात 2011 साली राष्ट्रीय स्तरावर कांस्यपदक.


यांचे लाभले मार्गदर्शन : खेळाडू कोट्यातून ते पोलिस दलात सहभागी झाले असून, सध्या ते नाशिकच्या शहर पोलिस दलामध्ये आयुक्तालयात कार्यरत आहेत. साई कोच विजय पाटील, पोलिस उपायुक्त संदीप दिवाण आणि अश्पाक शेख यांच्याकडून विशेष मार्गदर्शन लाभले.
इतर छंद : वैनतेय या गिरिभ्रमण संस्थेशी निगडित असून, दुर्गभ्रमंती आणि आडगाव येथील घरच्या शेतीत नवनवीन प्रयोग करीत राहण्याची आवड आहे.

आनंद खरे
(राष्ट्रीयस्तरावरील व्हॉलीबॉलपटू, उत्कृष्ट क्रीडा संघटक म्हणून शिवछत्रपती पुरस्कार)
विशेष प्रावीण्य : शालेय आणि महाविद्यालयीन जीवनापासून राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबॉल स्पर्धांमध्ये तब्बल 15 वर्षे सहभाग घेतला. महाराष्ट्राच्या वरिष्ठ व्हॉलीबॉल संघाचे 3 वर्षे नेतृत्व केले. तर टेनिस व्हॉलीबॉलमध्ये वरिष्ठ राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक. त्याशिवाय क्रिकेट , फुटबॉल आणि बॅडमिंटन स्पर्धांमध्ये राज्यस्तरावर सहभाग.

प्रशिक्षक आणि संघटक म्हणून कामगिरी : राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील सुमारे 600 खेळाडूंना प्रशिक्षण दिले. या खेळाडूंना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध खात्यांमध्ये खेळाडू म्हणून नोकरीदेखील लाभली आहे. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अगणित स्पर्धांचे आयोजन. त्याशिवाय संघटक म्हणून युथ कॉमनवेल्थ गेम्स तसेच युथ व्हॉलीबॉल विश्वचषकाचाही खूप मोठा अनुभव .

पुरस्‍कार विजेत्‍यांची छायाचित्रे पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा...