आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवकालीन शस्त्र संग्रहालय देशाला प्रेरणादायक ठरेल असे उभारणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जुनागंगापूर नाका येथील इतिहास उद्यानातील जागेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने शिवकालीन शस्त्रांचे संग्रहालय उभारण्यास शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी हिरवा कंदील दाखवला असून, साेमवारी जागेची पाहणी केल्यानंतर पुरंदरे यांनी महाराष्ट्राची प्रतिमा-प्रतिभा उंचावणारे, उद्बाेधक असे देशाला प्रेरणादायक ठरेल असे संग्रहालय करण्यासाठी तज्ज्ञांसमवेत अाराखडा तयार केला जाईल त्यासाठी सर्वांचेच सहकार्य लागेल, असेही स्पष्ट केले.

इतिहास उद्यानातील जागेत शस्त्र संग्रहालय करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुढाकार घेतला हाेता. काही िदवसांपूर्वी पुरंदरे यांच्या पुण्यातील निवासस्थानी गेल्यानंतर येथे शिवकालीन जुनी शस्त्रे बघितली. त्यातील काही गंजलेल्या शस्त्रांचे जतन करण्याची इच्छा बाेलून दाखवल्यावर पुरंदरे यांनी हाेकार दिला हाेता. त्यानंतर राज यांनी बाळासाहेबांच्या नावाने संग्रहालय तयार करण्याची घाेषणा केली हाेती. दरम्यान, कल्याण-डाेंबिवली निवडणुकीत व्यस्त झाल्यामुळे संग्रहालयाच्या जागेच्या पाहणीचा विषय मागे पडला हाेता. अखेर साेमवारी पुरंदरे यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष पाहणी केली. इतिहास स्मारकातील दाेन माेठ्या वास्तू, अॅम्पी थिएटर निसर्गरम्य जागेचा वापर शिवकालीन संग्रहालयासाठी कसा करता येईल, याची माहिती ठाकरे यांनी पुरंदरे यांना दिली. त्यानंतर पत्रकारांशी बाेलताना पुरंदरे यांनी ठाकरे यांच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी तयारी दाखवली. परदेशापेक्षाही भारताचे नाव उंचावेल.

पुण्याहून हेलिकाॅप्टरने अागमन
शिवशाहीरबाबासाहेब पुरंदरे यांना पुणे येथून खास हेलिकाॅप्टरने नाशिकला अाणण्यात अाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना वाहनाने प्रवास करणे शक्य नसल्याने त्यांना हेलिकाॅप्टरने अाणण्यात अाले. सुमारे अर्ध्या तासाच्या पाहणीनंतर त्याच हेलिकाॅप्टरने ते पुण्याला रवाना झाले.
दरम्यान, जितेंद्र अाव्हाड युवा फाऊंडेशनने नाशिकमध्ये उभारण्यात येणाऱ्या एेतिहासिक शस्त्रास्त्र संग्रहालयाच्या उभारणीत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्तक्षेपास विराेध केला अाहे.
नियाेजनबद्ध अचूक अाराखडा तयार करणार
अमेरिका,इंग्लंडपेक्षा निश्चितच एक पाऊल पुढे असे संग्रहालय तयार करण्यासाठी संबंधित तज्ज्ञांशी चर्चा करून एक नियाेजनबद्ध अचूक अाराखडा तयार केला जाईल, असे पुरंदरे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राचा इतिहास वर्तमान या दाेघांची सांगड घातली जाईल. एक उत्तम, कलात्मक पवित्र वास्तू तयार केली जाईल. त्यासाठी थाेडा अवधी निश्चितच लागेल. मात्र, मराठीपण अधिक उंचावेल संपूर्ण देशाला प्रेरणा अानंद देणारी वास्तू तयार हाेईल. राज ठाकरे हे एक कलावंत असून, त्यांच्या रसिकदृष्टिकाेनातून संग्रहालय पूर्णत्वास जाईल, अशीही ग्वाही त्यांनी दिली.

राज यांचे नाशिकवर पुन्हा लक्ष केंद्रित
कल्याण-डाेंबिवलीिनवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर नाउमेद हाेता राज यांनी पुन्हा नाशिकवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून अाले. संग्रहालयाबराेबरच सिडकाेतील संभाजी स्टेडियमच्या जागेचा कायापालट करण्यासाठी सीएअार अॅक्टिव्हिटीतून चाचपणी सुरू केली असून, एका कंपनीच्या प्रतिनिधींना जागा दाखवून महापाैर अशाेक मुर्तडक यांनी बैठकही घेतली. टाटा कन्सल्टन्सी कंपनीनेही नेहरू उद्यानाच्या जागेची साेमवारी पाहणी केली.