आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेनेच्या ‘शिवसंपर्क’चा प्रथम टप्पा पूर्णत्वाकडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेच्या अागामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सुरू केलेल्या शिवसंपर्क अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या अभियानाचा पहिला टप्पा पूर्णत्वाकडे वाटचाल करीत अाहे. यापुढील काळात बुथ प्रमुखांची यंत्रणा कार्यान्वित करणे, याद्यांवर काम करणे अादींवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार असून त्यानंतर चाैक सभांमधून विराेधकांवर फैरी झाडण्यात येणार अाहेत.
महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने सेनेने कंबर कसली अाहे. निवडणुकीपूर्वीची वातावरण निर्मिती अाणि तयारीसाठी सेनेचे शिवसंपर्क अभियान प्रत्येक प्रभागात राबविले जात अाहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आगामी निवडणुकीच्या सेनेतील प्रचार यंत्रणेस अधिक गतिमान आणि क्रियाशील करण्याच्या उद्देशाने या अभियानाची सुरुवात करण्यात आली. यात प्रत्येक प्रभागात नागरिकांशी थेट संपर्क करुन त्यांच्या अडचणी, तक्रारी जाणून घेण्यात येत अाहेत. तसेच, त्यावर उपाययाेजना करण्याचे अाश्वासनही दिले जात अाहे. अाजवर जवळपास सर्वच प्रभागांत हे अभियान राबविण्यात अाल्याचे महानगरप्रमुख अजय बाेरस्ते यांनी सांगितले.

या अभियानात शहरात बिघडलेली कायदा सुव्यवस्था, गाेदापार्क, पार्किंग, उद्याेगांचे स्थलांतरण, धरणातून पाणी पळविणे, पर्यटन अशा मुद्यांवर उहापाेह केला जात अाहे. तसेच, या विषयी जनतेची मतेही जाणून घेतली अाहेत. या पुढील काळात अाता बुथ प्रमुखांची यंत्रणा कार्यान्वित करणे तसेच याद्यांवर काम करणे अादींवर भर दिला जाणार अाहे. त्यानंतर पुढील पंधरवड्यात शहरातील प्रमुख चाैकांमध्ये सभा घेण्यात येणार अाहेत. त्यात विराेधकांवर ताेफ डागण्यात येणार अाहे.

प्रत्येक बैठकीला भरभरून प्रतिसाद
^शिवसंपर्क अभियानाच्या प्रत्येक बैठकीला नाशिककरांचा भरभरून प्रतिसाद मिळाला अाहे. यापुढील काळात चाैकसभांमधून विराेधकांचा समाचार अाम्ही घेणार अाहाेत. -अजय बाेरस्ते, महानगरप्रमुख, शिवसेना
बातम्या आणखी आहेत...