आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीजे, मंडप शुल्क, जाचक तपासणीविराेधात शिवसेना अाक्रमक, अाज जिल्हाधिकाऱ्यांची घेणार भेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महाराष्ट्रात एकापाठाेपाठ एक सणांवर जाचक अटींचे निर्बंध लादण्याचे सत्र सुरू असल्याचा अाराेप करीत शिवसेनेने गणेशाेत्सवासाठी सार्वजनिक मंडळांना मंडप शुल्क वाढवण्यापासून तर डीजेवर बंदी तसेच जाचक तपासणीतून तत्काळ दिलासा देण्याची मागणी केली अाहे. शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बाेरस्ते यांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन तत्काल जाचक अटी मागे घ्या, अशी मागणी केली जाणार असल्याचे सांगितले. 

दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशाेत्सव उत्साहात साजरा करण्याची तयारी सुरू झाली अाहे. गणेश मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात असून, शहरात पारंपरिक वा नेहमीच्याच ठिकाणी मंडप उभारणी सुरू झाली अाहे. मात्र, मंडप उभारल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेच्या जाचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी वाढल्या अाहेत. 

यंदा रस्त्यावर मंडप उभारण्यासाठी नानाविध परवानगीचा ससेमिरा लावला गेला अाहे. या परवानगी घेतल्यानंतर तपासणीसाठी प्रांतधिकारी, तहसिलदार, विभागीय अधिकारी, पाेलिस अधिकाऱ्यांचे पथक नानाविध त्रुटी काढत अाहे. महापालिकेने दहा बाय दहाच्या मंडपासाठी ४५० रुपयांएेवजी ७५० रूपये इतके शुल्क वाढवले अाहे. डीजेच्या अावाजावर निर्बंध असून, साध्या या कक्षातील डेसिबल माेजणी केली तर ६० ते ७० इतके प्रमाण असेल अशी खिल्ली बाेरस्ते यांनी उडवली. साध्या अावाजातील चर्चचा अावाजही ६० ते ७० डेसिबल इतका असताे असे डीजेचालकांनी शिवसेनेसमाेर प्रात्याक्षिकाद्वारे स्पष्ट केल्याचे बाेरस्ते यांनी सांगितले. हिंदूंच्या सणांवर काही ना काही बालंट अाणण्याचे प्रकार वाढत असल्याचा अाराेप करीत जिल्हाधिकाऱ्यांची शिवसेना शिष्टमंडळ भेट घेऊन मंडळांना दिलासा देण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

दत्तक नाशिक घेणारे मुख्यमंत्री सुस्त 
तिकडेउत्तर प्रदेशमध्ये कावड यात्रेसाठी डीजेच्या अावाजावरील निर्बंधांना भाजपच्याच मुख्यमंत्र्यांनी याेग्य ते उत्तर देत हिंदू धर्मीयांची पाठराखण केली. गुजरातमध्ये पहाटेपर्यंत गरबा रंगताे, कारण तेथील मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा असताे. मग महाराष्ट्रात हिंदू धर्मीयांच्या सणांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे का दक्ष नसतात, असा प्रश्न बाेरस्ते यांनी केला. याेगायाेगाने मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतले असल्यामुळे महाराष्ट्रात नाही तर नाशिकसारख्या शहरातून हिंदू धर्मीयांचे सण उत्साहात साजरे हाेण्याच्या दृष्टीने निर्बंध हटवून वेगळा संदेश द्यावा, अशी मागणी बाेरस्ते यांनी केली.
बातम्या आणखी आहेत...