आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज दरवाढीविराेधात शिवसेना अाक्रमक, उद्याेजकांशी करणार चर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राज्यातील जनतेला घाम फाेडणाऱ्या वीज दरवाढीविराेधात शिवसेनेने अाक्रमक पवित्रा घेतला असून, पुढील आठवड्यात नाशिकचे पदाधिकारी विविध औद्योगिक संस्थांशी चर्चा करणार अाहेत. या प्रश्नी महावितरणला निवेदनही दिले जाणार आहे. २६ जुलै रोजी शिवसेनेच्या वतीने एमईअारसी आयोगापुढे जनतेची बाजू मांडली जाणार असल्याची माहिती महानगर- प्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली.
महावितरण कंपनीने ५.५ टक्के दरवाढीचा प्रस्ताव असे सांगून राज्यातील सव्वादोन कोटी वीजग्राहकांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार सुरू आहे. प्रत्यक्षात या प्रस्तावामध्ये दरवर्षी चक्रवाढ पद्धतीने वीज आकार स्थिर आकार या दोन्ही आकारात वाढीची मागणी करून एकूण वर्षांत वीजग्राहकांवर ५६,३७२ कोटी रुपये दरवाढीचा बोजा लादला आहे. त्यामुळे दोन्ही वाढीचा एकत्रित विचार करता ग्राहकांवर २०१६-१७ मध्ये टक्के वाढ होणार आहे. त्यानंतर २०१७-१८ मध्ये १३ टक्के, २०१८-१९ मध्ये २० टक्के, तर २०१९-२० मध्ये एकूण २७ टक्के याप्रमाणे दरवाढ आकारणी प्रस्तावित केलेली आहे. राज्य सरकारच्या आतापर्यंतच्या गेल्या २० महिन्यांतील सर्व आश्वासनांना हरताळ फासणारा हा दरवाढ प्रस्ताव असल्याचा दावा शिवसेनेने केला अाहे. सेनेचे महानगरप्रमुख अजय बाेरस्ते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, हा प्रस्ताव सर्वसामान्य घरगुती, व्यापारी शेतकरी वीजग्राहकांचे कंबरडे मोडणारा आहे. त्याचबरोबर राज्याला औद्योगिकदृष्ट्या भकास करणारा प्रस्ताव आहे.

महावितरण आणि राज्य सरकार यांनी वीजग्राहकांसमोर आंदोलनाशिवाय कोणताही पर्याय शिल्लक ठेवलेला नाही. वास्तविक राज्याचे हित विकासाच्या दृष्टीने या सर्व बाबींचे भान राज्य सरकारला असायला हवे. पण, दुर्दैवाने राज्य शासन, मुख्यमंत्री ऊर्जामंत्री फक्त ‘घोषणा’ करीत आहेत. नोकरशाही आपल्या सोयीनुसार हवे तसे निर्णय घेत आहे, हेच या प्रस्तावातून दिसून येत आहे, असेही बाेरस्ते यांनी म्हटले.

बहुवर्षीय रचनेचा साेयीस्कर अर्थ
^महावितरणने आपल्याया प्रस्तावाच्या रूपाने ‘बहुवर्षीय दररचना’ या कायद्यातील त्याचबरोबर राज्यातील सव्वादोन कोटी वीजग्राहकांची क्रूर चेष्टा केली आहे. ‘बहुवर्षीय दररचना’ याचा कायद्याला अभिप्रेत अर्थ वीजदर ते वर्षे स्थिर भावाने गरज पडल्यास केवळ इंधन समायोजन आकारात थोडाफार बदल होणे, असा आहे. महावितरणने ‘बहुवर्षीय दररचना’ याचा अर्थ ‘दरवर्षी हमीभाववाढ’ असा लावला अाहे. -अजय बाेरस्ते, महानगरप्रमुख, शिवसेना
बातम्या आणखी आहेत...