आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज-उद्धव एकत्र येणार?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली त्याला आता सात वर्षे झाली आहेत. तेव्हापासून राज-उद्धव एकत्र येणार असल्याच्या भाबड्या चर्चा रंगवल्या जातात. बाळासाहेबांच्या आजारपणात राज यांनी ‘मातोर्शी’च्या पायर्‍या चढल्या. हृदयरोगाने आजारी असलेल्या उद्धव ठाकरे यांनाही ते रुग्णालयातून स्वत: गाडी चालवत ‘मातोर्शी’वर घेऊन गेले. या घटनांमुळे तर राज-उद्धव एकत्रिकरणाच्या आशांना पालव्या फुटली होती. ‘राजमुळे मराठी मते फुटतात आणि कॉँग्रेस-राष्ट्रवादीचा फायदा होतो,’ हा आरोप शिवसेना, भाजपच्या नेत्यांकडून झाला. राज ठाकरेंनी तो झिडकारून लावला. ‘मुंबईच्या भल्यासाठी, मराठी माणसासाठी राज-उद्धवनी एकत्र यावे,’ या भावनिक आवाहनाकडेही त्यांनी दुर्लक्ष केले. प्रत्यक्षात, राज आणि उद्धव यांनी त्यांच्या राजकीय वाटचालीचा मार्ग निश्चित केला आहे. हे दोघे भाऊ एकमेकांच्या नेतृत्वाखाली काम करू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची व्यक्तिगत मैत्री आहे. या मैत्रीचा वास्ता देत मोदी राजचे मन वळवतील, ही आशा शिवसेना-भाजपमधल्या काही ‘तज्ज्ञां’नी अजून सोडलेली नाही.