आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना भाजप दाेघांनीही स्वबळावर नाशिक महापालिकेत सत्तास्थापनेचा केला दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महापालिकेत अाम्हीच स्वबळावर सत्ता स्थापन करणार, असा मुद्दा शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बाेरस्ते भाजपचे शहराध्यक्ष अामदार बाळासाहेब सानप मांडत असावेत... - Divya Marathi
महापालिकेत अाम्हीच स्वबळावर सत्ता स्थापन करणार, असा मुद्दा शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बाेरस्ते भाजपचे शहराध्यक्ष अामदार बाळासाहेब सानप मांडत असावेत...
नाशिक - महापालिकेवर पुढील पाच वर्षांसाठी सत्ता काेणाची, याचा फैसला गुरुवारी (दि. २३) हाेणार असून, मतमाेजणीला पूर्वसंध्येला प्रमुख राजकीय पक्षांच्या शहराध्यक्षांनी अपेक्षित जागांचे गणित मांडल्यानंतर त्यात शिवसेना भाजप यांनी एकहाती सत्तास्थापनेचा दावा केला.
 
भाजप शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी ६२ प्लस हाेईल असा दावा केला, तर शिवसेना महानगरप्रमुख अजय बाेरस्ते यांनी ६० जागांपर्यंत शिवसेना धडक मारेल, असा अंदाज बांधत स्वबळावर सत्तास्थापनेचा प्रयत्न असेल, असे स्पष्ट केले. त्यामुळे गुरुवारी नेमके स्पष्ट बहुमत मिळेल की दाेन्ही पक्षांना सत्तेसाठी टेकू काेणाचा घ्यावा लागेल, हे बघणे महत्त्वाचे ठरेल. 
 
महापालिकेच्या ३१ प्रभागांतील १२२ जागांसाठी मंगळवारी मतदान झाले. या निवडणुकीसाठी तब्बल ८२१ उमेदवार रिंगणात हाेते. मात्र, या निवडणुकीत सर्वांचेच लक्ष शिवसेना भाजपकडे हाेते. या दाेन्ही पक्षांची केंद्र राज्यात असलेली सत्ता, सुप्त लाट, वजनदार चेहरे अादी जमेच्या बाजू असताना गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार, उमेदवारीसाठी हाणामारीपासून तर अार्थिक व्यवहारापर्यंत झालेले अाराेप, व्हायरल क्लिप्स यामुळे दाेघांचे काय हाेणार, हा प्रश्न हाेता.
 
भाजपने अाधीपासूनच शत-प्रतिशतचा नारा देत शंभरपेक्षा अधिक जागा जिंकण्याचा अंदाज व्यक्त केला हाेता. शिवसेनेनेही एकहाती सत्ता मिळवून दाखवण्याचा निर्धार व्यक्त केला हाेता. दरम्यान, मतदानानंतर दाेन्ही पक्षांच्या शहराध्यक्षांना विचारले असता त्यांनी स्वबळावर सत्ता स्थापनेच्या दिशेने वाटचाल असल्याचे स्पष्ट केले. 
 
मनसे, राष्ट्रवादीला २० तर काँग्रेसला १२ ते १५ जागांची अपेक्षा 
महापालिकेत सत्तेत असलेल्या परंतु वेळेवर लाेकांपर्यंत विकासकामे पाेहोचू शकलेल्या मनसेला यंदा १८ ते २० जागांची अपेक्षा अाहे. राष्ट्रवादी काँग्रेसला १६ ते १८, तर काँग्रेसला १२ ते १५ जागांची अपेक्षा अाहे. दरम्यान, मनसे राष्ट्रवादीचा शिवसेनेला टेकू देऊन सत्तेत बसण्याचा प्रयत्न असणार अाहे. थाेडक्यात कमी जागा येऊन ‘किंगमेकर’ची भूमिका बजावण्याच्या तयारीत अाहेत. 
बातम्या आणखी आहेत...