आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेना-भाजपची पडद्याअाड महाअाघाडीविराेधात युती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखेरच्या अाठ महिन्यांत प्रभाग समिती सभापतिपदाची माळ गळ्यात पाडून घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांतील नाराजांनी बंडाचा झेंडा फडकवत परस्पर उमेदवारी अर्ज दाखल केल्याने नेत्यांची धावपळ उडाली.
दरम्यान, निवडणुकीसाठी मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस अपक्षांची महाअाघाडी स्थापन झाली असून, केवळ मनसे राष्ट्रवादीत सातपूरवरून चढाअाेढ सुरू अाहे. दुसरीकडे, सेना भाजपने पडद्याअाडून युती करून एकमेकांसमाेर बलाबलाचे कारण देत थेट उमेदवार दिले नाही, मात्र त्यांची युती हाेण्याची शक्यता अाहे. दरम्यान, सहा प्रभाग समिती सभापतिपदांसाठी २४ उमेदवार रिंगणात अाहेत. प्रभाग समिती सभापतिपदासाठी १२ १३ एप्रिल राेजी निवडणूक असून, त्यासाठी अर्ज दाखल करण्याची गुरुवारी अखेरची मुदत हाेती. निवडणुकीसाठी मनसे-राष्ट्रवादी, काँग्रेस अपक्षांनी महाअाघाडीवर शिक्कामाेर्तब केले. ‘रामायण’ येथे महापाैर अशाेक मुर्तडक, स्थायी समिती सभापती सलीम शेख, राष्ट्रवादीच्या विराेधी पक्षनेत्या कविता कर्डक, उपमहापाैर गुरुमित बग्गा, काँग्रेस गटनेते शाहू खैरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. खासकरून मनसेने पंचवटी, सातपूर नाशिक पूर्ववर दावा केला. अपक्षांनी नाशिक पूर्व किंवा पंचवटी मिळावे, असा अाग्रह धरला. काँग्रेसने नाशिक पश्चिम सिडकाे, तर राष्ट्रवादीने पंचवटी सातपूरची मागणी केली. यात पंचवटी मनसेकडे, अपक्षाकडे नाशिक पूर्व, काँग्रेसकडे नाशिक पश्चिम जाण्याची शक्यता असून, राष्ट्रवादीला सातपूर मिळाल्यास सिडकाेवर समाधान मानावे लागेल. दुसरीकडे शिवसेनेने सिडकाे, सातपूर नाशिकराेडसाठी सर्वाधिक संख्याबळ असल्याचे कारण देत उमेदवारी अर्ज दाखल केले, तर भाजपने पंचवटी, नाशिक पूर्व पश्चिम येथे अर्ज दाखल केले.
पश्चिमलाबंडखाेरांचे मनसेला अाव्हान नाशिकपश्चिम प्रभागात गेल्या वेळी महाअाघाडीतील काँग्रेसच्या याेगिता अाहेर यांना मनसेच्या अॅड. यतिन वाघ माधुरी जाधव यांच्या बंडखाेरीमुळे पराभवाचा सामना करावा लागला हाेता. त्यावेळी शिवसेना भाजपने जाधव यांना उमेदवार करून शह िदला हाेता. यंदाही पश्चिममधून मनसेतून भाजपत अालेल्या सुनीता माेटकरी यांना उमेदवारी िदली असून, काँग्रेस कशापद्धतीने बाजी मारते, हे बघणे महत्त्वाचे ठरणार अाहे. या ठिकाणी पक्षादेश बजावून बंडखाेरांना दणका देण्याच्या पवित्र्यात मनसे अाहे.

प्रभागनिहाय उमेदवार रिंगणात
नाशिकपूर्व - शेखरशिदा नूरमाेहम्मद (अपक्ष), सुमन विजय अाेहळ (मनसे), दीपाली सचिन कुलकर्णी (बंडखाेर, मनसे), रंजना ज्ञानेश्वर पवार (राष्ट्रवादी), नीलिमा अामले (राष्ट्रवादी), समिना शाेएब मेमन.

नाशिक पश्चिम - सुनीतानवनाथ माेटकरी (बंडखाेर, मनसे), शिवाजी गांगुर्डे (काँग्रेस), याेगिता अाहेर (काँग्रेस).

पंचवटी- परशरामवाघेरे (भाजप), दामाेधर मानकर (अपक्ष), ऋची कुंभारकर (मनसे), विमल पाटील (काँग्रेस).

नाशिकराेड- सुनीलवाघ (रिपाइं-शिवसेना), सूर्यकांत लवटे (शिवसेना), वैशाली भागवत (काँग्रेस).
सिडकाे- कल्पनापांडे (शिवसेना), सुवर्णा मटाले (मनसे), कांचन पाटील (मनसे), अश्विनी बाेरस्ते (काँग्रेस).
सातपूर- सविताकाळे (मनसे), नंदिनी जाधव (शिवसेना), उषाताई अहिरे (राष्ट्रवादी).

काँग्रेसचे बंडखोर पुन्हा स्वगृहातून लढणार
पक्षादेशाचे पालन केल्याप्रकरणी मनसेने विभागीय आयुक्तालयात पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत दाखल केलेल्या दाव्यात मनसेतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या नगरसेविका शोभना शिंदे आणि नगरसेवक संपत शेलार या दाेघांना अपात्र ठरविण्यात अाल्यानंतर शिवसेनेने त्यांना वाऱ्यावर साेडले. या बाबीचा धसका घेत काँग्रेसचे बंडखोर नगरसेवक कन्हैया साळवे नगरसेविका वैशाली भागवत हे पुन्हा काँग्रेस पक्षात परतले असून, आता प्रभाग समिती सभापतिपदाची निवडणूक स्वगृहातून लढविण्याची तयारी त्यांच्याकडून केली जात आहे.

बंडखाेरी राेखण्यासाठी महाअाघाडीचा व्हिप
नाशिक - पुढील अाठवड्यात हाेणाऱ्या सहाही प्रभाग समिती सभापती िनवडणुकीच्या निमित्ताने सर्वच पक्षांत बंडखाेरांचे पीक उगवण्याची शक्यता दिसू लागली अाहे. या पार्श्वभूमीवर महाअाघाडीच नव्हे, तर शिवसेना-भाजपही व्हिपकार्ड अर्थातच पक्षादेशाच्या निर्णायक अस्त्राचा वापर करण्याच्या पवित्र्यात अाहे.
प्रभाग समिती सभापतिपदासाठी अर्ज दाखल करण्याची गुरुवारी अखेरची मुदत हाेती, मात्र या मुदतीत राजकीय पक्षांना डावलून नगरसेवक उमेदवारी अर्ज दाखल करताना दिसत हाेते. परिणामी, महाअाघाडी तर साेडा, मात्र सत्ताधारी शिवसेना, भाजपसमाेरही बंडखाेरीचे अाव्हान दिसू लागले अाहे. प्रभाग समिती सभापतिपदासाठी नेत्यांना विचारता सूचक अनुमाेदक मिळवून अर्ज दाखल करण्यासाठी गटागटाने नगरसेवक फिरत हाेते. दुसरीकडे नेत्यांच्या वाटाघाटीसाठी बैठका सुरू हाेत्या. अखेरीस काेणीही अर्ज भरले तर पक्षादेश काढून त्यांच्यावर दबाव टाकण्याची रणनीती सर्वांनीच स्वीकारली अाहे. पक्षादेश माेडल्यामुळे मनसेचे अपात्र ठरलेल्या नगरसेवकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी व्हिपकार्ड अर्थातच पक्षादेश बजावण्याचे धाेरण अाखले अाहे.

पंचवटी- विभागात२४ नगरसेवक असून, विजयासाठी १३ मॅजिक फिगर अाहे. मनसेकडे ७, राष्ट्रवादीकडे ५, काँग्रेस २, अपक्ष असे जवळपास महाअाघाडीचे संख्याबळ १६ अाहे. त्यामुळे येथे मनसेचे एखाद-दाेन नगरसेवक फुटले तर महाअाघाडीच्या पराजयाची शक्यता कमी अाहे. भाजपला उमेदवारी असून, येथे भाजपचे ७, तर शिवसेनेकडे असे संख्याबळ अाहे.
नाशिकराेड- २४जागा असलेल्या या विभागातही मॅजिक फिगरसाठी १३ मते लागतील. शिवसेनेकडे नगरसेवक असून, मनसेचे दाेन नगरसेवक मिळून मतदानाचा अाकडा दहा हाेणार आहे. विभागीय अायुक्तांच्या अादेशानुसार अपात्रतेची कारवाई झाल्यास ही मते काेणाच्याही खात्यावर जाणार नाही. त्याचा फटका मनसेला बसणार असून, त्यांच्याकडे उमेदवार उरतील. दरम्यान, या ठिकाणी शिवसेना रिपाइं या युतीतील घटक पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला असल्यामुळे त्यांच्या खात्यातील जागा निश्चित झाली अाहे.

नाशिकपूर्व - २४जागा असलेल्या या विभागात १२ मॅजिक फिगर असून, येथे मनसेचे ९, राष्ट्रवादी ५, काँग्रेस ४, अपक्ष असे २१ संख्याबळ अाहे. या ठिकाणी मनसेचे चार, तर राष्ट्रवादीचा एक नगरसेवक सेना-भाजपात गेल्यामुळे महाअाघाडीचे संख्याबळ १५ झाले अाहे. येथे सेनेचे २, तर भाजपचे असे संख्याबळ अाहे. मात्र, विजयासाठी त्यांना मतांची गरज असल्यामुळे फाटाफुटीवर विजयाचे गणित असेल.

नाशिकपश्चिम - १४जागांसाठी मॅजिक फिगर असून, मनसेचे ५, राष्ट्रवादी १, काँग्रेस असे नऊ संख्याबळ अाहे. दरम्यान, येथे मनसेतून गेलेले माजी महापाैर यतिन वाघ, माधुरी जाधव, राष्ट्रवादीतील विनायक खैरे यांच्यामुळे संख्याबळ अाता महाअाघाडीचे सदस्य उतरले अाहेत. दुसरीकडे शिवसेनेचे २, तर भाजपचे असे संख्याबळ असून, तीन नगरसेवकांच्या मदतीने त्यांचे संख्याबळ अाठ इतके हाेणार अाहे. या परिस्थितीत पक्षादेश निर्णायक ठरणार असून, त्या जाेरावर काेण बाजी मारते, हे बघणे महत्त्वाचे ठरणार अाहे.

सिडकाे- २२जागा असलेल्या विभागात विजयासाठी १२ मतांची गरज अाहे. मनसेकडे ७, राष्ट्रवादीकडे ३, काँग्रेस असे या ठिकाणी १२ संख्याबळ अाहे. मात्र, या ठिकाणी मनसेचे अरविंद शेळके सेनेत गेल्याने त्यांचे संख्याबळ झाले अाहे. अर्थात माकपचे मत महाअाघाडीसाेबत राहण्याची शक्यता लक्षात घेत येथे पारडे जड अाहे.