आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेना-भाजप युतीच्या भीतीने बंडखाेरांना घाम...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - भाजप-शिवसेनेचीलाट लक्षात घेत या पक्षाकडे उमेदवारीसाठी गर्दी करणाऱ्या नगरसेवकांचे लक्ष अाता संभाव्य युती वा अाघाडीकडे लागले असून, स्वबळाची भाषा करणाऱ्या दाेन्ही पक्षांची एेनवेळी युती झाली तर पत्ता कट हाेईल या भीतीने अाता मनसे, राष्ट्रवादीतील बंडखाेरांना घाम फुटू लागला अाहे.
महापालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी अारक्षण साेडत संभाव्य प्रारूप प्रभागरचना जाहीर झाली. नवीन प्रभागरचनेच्या सीमा अारक्षित जागा कळाल्यामुळे अाता विद्यमान नगरसेवकांची पावले शिवसेना भाजप या सध्या चर्चेत असलेल्या पक्षाच्या दिशेने वळत अाहेत. काही नगरसेवकांनी यापूर्वीच दाेन्ही पक्षांत प्रवेश करून दावेदारी सुरू केली अाहे. अारक्षणानंतर जवळपास सर्वसाधारण अाेबीसी मिळून जेथे स्त्री पुरुष काेणीही उभे राहू शकते अशा साधारण ४५ जागा अाहेत. या जागांच्या माध्यमातून जास्तीत जास्त नगरसेवकांचे उभे राहण्याचे प्रयत्न अाहेत. दुसरीकडे, जागा ४५ इच्छुक शंभराहून अधिक असल्यामुळे तिकीट मिळवण्यासाठी कसरत अाहे. अशात शिवसेना भाजप स्वबळावर लढले तर संधी अाहे, मात्र दाेघांची युती झाली तर जागा काेणाला सुटते यावर सर्व अवलंबून असणार अाहे. अारक्षण साेडत जाहीर झाल्यानंतर अाता मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस साेडून अालेल्या नगरसेवकांना युतीची भीती सतावत अाहे. युती झालीच तर पुन्हा काेणत्या पक्षाचा घराेबा करायचा, या विवंचनेने त्यांना ग्रासल्याचे चित्र अाहे.
दरम्यान, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेसची भिस्त पूर्णत: बंडखाेरांवर असून, युतीतून ज्यांचा पत्ता कट हाेईल त्यांना खेचण्यासाठी धडपड अाहे.

मनसे-भाजप युतीची हाेतेय सर्वत्र चर्चा
साेडतीपूर्वी शिवसेना मनसेची युती हाेईल अशी चर्चा हाेती. मात्र, साेडतीनंतर मनसे भाजपची युती हाेईल अशी चर्चा सुरू झाली अाहे. भाजपला काेणत्याही परिस्थितीत शिवसेनेला धक्का द्यायचा असून, त्यासाठी मनसेची मदत घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बाेलले जाते. नाशिकपेक्षा मुंबईत भाजपला मनसेची मदत लागणार असून, त्यादृष्टीने युतीबाबत विचार सुरू झाल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. सद्यस्थिती मनसेची अवस्था शरपंजर असून, त्यांना शिवसेना भाजपकडून हात अाला तर एकप्रकारे संजीवनीप्रमाणेच ठरणार अाहे. मनसेला जेमतेम ४० ते ५० जागा अपेक्षित असून, त्यांची फारशी अपेक्षा नसल्याचे लक्षात घेत भाजपकडून संभाव्य युतीबाबत चाचपणी हाेत असल्याचे बाेलले जाते.

बातम्या आणखी आहेत...