आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Campaign Kumbh Mela Issue At Nashik, Divya Marathi

कुंभमेळा निधीसाठी शिवसेना सरसावली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- कुंभमेळ्याच्या कामांसाठी महापालिकेकडे निधी नसल्यामुळे केंद्राने मदतीचा हात देण्याची मागणी शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार हेमंत गोडसे यांच्यासह पालिकेतील पदाधिकार्‍यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे केली.

गोडसे यांच्यासह विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर व पदाधिकार्‍यांनी जेटली यांची भेट घेऊन सिंहस्थासाठी निधी कमी पडत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. कुंभमेळा पर्वण्यांसाठी राज्य सरकारकडून हवी तेवढी मदत मिळालेली नाही. महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे जवळपास एक हजार कोटी रुपयांच्या निधी उभारणीत अडचणी येत असल्याचेही त्यांनी जेटली यांच्या लक्षात आणून दिले.