आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात 2 वेळा पाण्यासाठी शिवसेनेचा अाक्रमक पवित्रा, धरण भरल्यानंतरही काही भागात टंचाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- यंदा मुसळधार पावसामुळे गंगापूरसह समूहातील धरणे तुडुंब भरली असताना शहरात मात्र अनेक ठिकाणी पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून या पार्श्वभूमीवर तत्काळ दाेन वेळ पाणीपुरवठा सुरू करावा, या मागणीसाठी शिवसेनेने अाक्रमक पवित्रा घेतला अाहे.
 
मुख्य म्हणजे, जायकवाडीला ४० टीएमसीपेक्षा अधिक पाणी गेले असतानाही शहरात पाणी बचतीचे छुपे प्रयत्न भविष्यात अाैरंगाबादला पाणी साेडण्याचाच भाग नाही ना, असाही संशय विराेधी पक्षनेते अजय बाेरस्ते यांनी व्यक्त केला अाहे. मुबलक पाणी असताना कपातीच्या प्रकारामुळे पालिकेचे भविष्यातील पाणी अारक्षण कमी हाेण्याचा धाेका असल्याचाही दावा त्यांनी केला. 
 
पावसाची चांगली कृपा असल्यामुळे यंदा जुलैमध्येच गंगापूर धरण ८० टक्क्यांपेक्षा अधिक भरले अाहे. तसेच, दारणासह गाैतमी-गाेदावरी, काश्यपी, अाळंदी हे प्रकल्पही भरले अाहेत. मध्यंतरी गंगापूर धरणावर महापाैर रंजना भानसी यांच्या हस्ते जलपूजनही करण्यात अाले. त्यावेळीच शिवसेनेने शहरात दाेन वेळ पाणीपुरवठ्याची मागणी केली हाेती. धरणात मुबलक पाणी असले तरी, शहरात अनेक ठिकाणी पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचे बाेरस्ते यांनी सांगितले. शिवसेनेचे अनेक नगरसेवक पाणी टंचाईच्या तक्रारी करीत अाहेत.
 
सिडकाे तर पाणीटंचाई अधिक असल्याचे सेना नगरसेवक शाम साबळे यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर महापाैर भानसी यांनी तत्काळ अाढावा घेऊन शहरात सकाळी सायंकाळी अशा दाेन्ही वेळा पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी बाेरस्ते यांनी केली. एकवेळ पाणी साेडल्यामुळे जलवाहिन्यांमध्ये पाणी शिल्लक राहत नाही, तसेच हवाही साचते. त्यामुळे दाेन वेळ पुरवठा करावा अन्यथा शिवसेना अापल्या पद्धतीने अांदाेलन छेडेल, असाही इशारा त्यांनी दिला. 
 
घरपट्टी, पाणीपट्टी वाढीला विराेध 
घरपट्टीपाणीपट्टीचे सर्वेक्षण सुरू असून या सर्वेक्षणात अनेक करबुडवे अाढळले अाहेत. मिळकत सर्वेक्षण अद्याप सुरू असून जवऊपास ९१ हजारापेक्षा अधिक मिळकतींना घरपट्टी नसल्याचे लक्षात अाले अाहे. त्यामुळे अाधी करबुडव्यांकडून किती महसुल मिळताे हे बघून त्यानंतर प्रामाणिक करदात्यांवर दरवाढीचा वरवंटा फिरवावा, असा चिमटा बाेरस्ते यांनी सत्ताधारी भाजपला घेतला. 
 
यांत्रिक झाडूही नकाेच 
यंत्रखरेदी करायची ते सडत ठेवायचे असे अनेक प्रकार गेल्या काही वर्षांत महापालिकेत झाले अाहेत. पाणवेली काढणारे राेबाेटिक मशीन असाे की खत प्रकल्पावरील काेट्यवधीची यंत्रे, हा त्याचाच पुरावा अाहे. त्यामुळे यांत्रिक झाडू खरेदीला शिवसेनेने विराेध केला. 
 
बातम्या आणखी आहेत...