आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवास समाजोपयोगी उपक्रमांनी प्रारंभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्ष उत्सवास प्रारंभ झाला असून, यानिमित्त शिवसेनेने शहरभरात विविध समाजोपयोगी उपक्रम सुरू केले आहेत. वर्षभरात यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

शिवसेना नाशिक मध्यच्या वतीने यानिमित्त लोणार गल्ली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते, िजल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांच्यासह पप्पू टिळे, नीलेश कुलकर्णी, योगेश बेलदार, नाना काळे, आशिष साबळे, आदित्य बोरस्ते, विजय काकड आदी उपस्थित होते. शिवसेना नाशिक मध्य प्रभाग क्रमांक ३१ बोधलेनगर, उत्तरानगर येथे ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी तसेच पालकांसाठी जातप्रमाणपत्र, डोमिसाइल सर्टिफिकेट, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्र, एस.ई.सी. प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक कार्ड वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते, माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, आशिष साबळे, करण राजपूत, प्रवीण आंधळे, मधुकर गिरी, नारायण परदेशी, चेतन शेलार, योगेश शेवरे, अनिल निरभवणे, सुशांत अधिकारी, रोहन सोमण, धीरज शिंदे आदी उपस्थित होते.
अंबड येथील नाशिक मनपा शाळा क्र. ७२ ७३ च्या विद्यार्थ्यांना शिवसेना वर्धापनदिनानिमित्ताने लाडू वाटपप्रसंगी शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, नगरसेवक उत्तम दोंदे, शोभा फडोळ, तानाजी फडोळ, मामा ठाकरे, वामनराव दातीर, रामकृष्ण दातीर, सुभाष गायधनी आदी उपस्थित होते. कामटवाडे येथील स्व. मीनाताई ठाकरे विद्यालय येथे शैक्षणिक साहित्य वाटपप्रसंगी अजय काकडे, सुभाष गायधनी, प्रताप मटाले, राजेंद्र नानकर, पवन मटाले, नाना पाटील, कैलास चौधरी आदी उपस्थित होते.
शिवसेना सातपूर विभागाच्या वतीने महिलांना तुळस वाटप करण्यात आली. याप्रसंगी नगरसेवक विलास शिंदे, श्यामला दीक्षित, लोकेश गवळी, भागवत आरोटे, दीपक आरोटे, सुभाष गायधनी, महेंद्र शिंदे, चेतन उगले, नरेश सोनवणे, प्रशांत सोनवणे, गोरख घाटोळ, बापू बाविस्कर, लीलावती भवर, श्रद्धा जोशी, सौ. सोनवणे, दीपक खुर्दळ, विजय वाडेकर आदी उपस्थित होते. राज्य कामगार विमा योजना रुग्णालय सातपूर, नाशिक येथील रुग्णांना फळवाटप करण्यात आले. तुकाराम मोराडे, सुभाष गायधनी, अजय काकडे, योगेश बेलदार, राजेंद्र नानकर, पवन मटाले, नाना पाटील, कैलास चौधरी आदी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...