आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना पदाधिकारी साधणार उद्धव ठाकरेंशी ‘हायटेक’ संवाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पारंपरिक पठडीतून बाहेर पडत हायटेक झालेल्या शिवसेनेच्या नाशिक कार्यालयात राज्यातील पहिली व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या सुविधेद्वारे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी पदाधिकारी व गटप्रमुखांना आता थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पदाधिकाºयांबरोबरच स्वत:चा वेळ वाचविण्यासाठी नाशिक शिवसेनेचे हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीतील यशामुळे शिवसेना पदाधिकारी आत्मविश्वासाने कामाला लागले असून, हायटेक तंत्रज्ञानामुळे कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना कार्यालयात 60 इंची एलईडी स्क्रीन असलेली व्हीसीची यंत्रणा उभारण्यात आली आहे. सद्यस्थितीत अशी सुविधा असलेले शिवसेनेचे राज्यातील हे पहिलेच कार्यालय असून, त्याची जोडणी मातोश्री व शिवसेना भवनाला करण्यात येणार आहे. त्याद्वारे विधानसभा निवडणुकीसाठी शिवसैनिकांनी काय करावे, बूथप्रमुखांकडून कोणती कामे करून घ्यावी व मतदारांच्या समस्या या बाबी ठाकरे जाणून घेतील.
साधारण आठवड्यातून एकदा पदाधिकाºयांबरोबर ठाकरे यांची बैठक होईल. त्यामुळे मुंबई ते नाशिक असा बैठकीसाठी प्रवासात खर्च होणारा वेळ वाचेल व एकावेळी किमान 50 पदाधिकाºयांबरोबर चर्चा होईल, असा विश्वास महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी व्यक्त केला.
कुटुंब कार्डही येणार : शिवसेनेने प्रत्येक मतदाराला कुटुंब कार्ड देण्याचा निर्णय घेतला असून, यात कुटुंबातील मतदार व त्यांचा मतदार यादीतील क्रमांक असेल. जेणेकरून मतदानासाठी त्यांना कोणतीही अडचण येणार नाही. त्याबरोबरच ‘माझा महाराष्ट्र-भगवा महाराष्ट्र ’ या सप्ताहात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असून, 23 जुलैपर्यंत हा उपक्रम सुरू असेल. नवीन शाखांची उभारणी व जुन्या शाखांचे नूतनीकरणही केले जाईल