आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भांबावलेल्या शिवसेनेला नगरपालिकेचा बुस्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दाेन महिन्यांपूर्वी नाशिकराेडमधील दाेन प्रभागांच्या पाेटनिवडणुकीत भाजपने साम-दाम-दंड अशा नीतीचा वापर करून शिवसेनेला धाेबीपछाड दिल्यानंतर त्याचीच पुनरावृत्ती महापालिका निवडणुकीत भाजपकडून हाेणार तर नाही ना, या भीतीने ग्रासलेल्या शिवसेनेला नगरपालिका निवडणुकीमुळे नवीन बुस्ट मिळणार अाहे. याबराेबरच भाजपच्या कुंपणावर असलेल्या मनसे, राष्ट्रवादी काँग्रेसमधील नगरसेवक वा वजनदार इच्छुकांच्याही शिवसेनेकडे रांगा लागतील, असे चित्र नगरपालिका निवडणुकीतील निकालामुळे दिसत अाहे.

केंद्र राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपने दाेन महिन्यांपूर्वी नाशिकराेड विभागातील दाेन्ही प्रभाग लीलया खिशात घातले. शिवसेनेला टक्कर देताना भाजपने सर्व तंत्रांचा अवलंब केला. एवढेच नव्हे, तर गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या या नेत्यांना पक्षात पावन करून साधनसुचिता शिस्तीच्या प्रतिमेला तडा जाण्याची भीतीही बाळगली नाही. त्यानंतरही गुन्हेगारांना पक्षात घेण्याचे सत्र थांबले नाही. अापण काहीही केले तरी परिणाम हाेणार नाही, अशा ग्रहातून भाजपने वेगाने मुसंडी मारण्याची तयारी केली हाेती. नगरपालिका निवडणूक महापालिकेची 'लिटमस टेस्ट' असल्यामुळे त्यांनी महत्त्वाचे नेते रिंगणात उतरवले हाेते. खासकरून शहरालगत महापालिका क्षेत्रावर परिणाम करणाऱ्या भगूूर सिन्नर नगरपालिकेसाठी भाजपने शक्ती पणाला लावली हाेती. तुलनेत शिवसेनेकडे वजनदार नेते नसल्यामुळे त्यांच्या भवितव्याविषयी चिंता हाेत हाेती, मात्र साेमवारी भगूरमध्ये शिवसेनेने भाजपचा जणू एखाद्या वाघाप्रमाणे पाडलेला फडशा सिन्नरमध्ये माजी अामदार माणिकराव काेकाटे यांना मुख्यमंत्र्यांनी बूस्ट देऊनही झालेले पानिपत लक्षात घेता शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले अाहे. महापालिका निवडणुकीत भाजपशी दाेन हात करताना वजनदार नेते अन्य शक्ती नसल्या तरी जाेरदार टक्कर हाेऊ शकते, असाही संदेश मिळाल्यामुळे शिवसेनेचे पारडे जड झाले अाहे. या पार्श्वभूमीवर अाता अन्य पक्षातून येणाऱ्यांची पहिली पसंती तूर्तास भाजपएेवजी शिवसेनेकडे जाण्याची शक्यता व्यक्त हाेत आहे. शिवसेनेने अनेक ठिकाणी मजबूत पॅनल निर्मितीवर दिलेली भर हीदेखील जमेची बाजू असल्यामुळे भाजपकडे जाणाऱ्यांचा अाेघ येत्या काही दिवसांत शिवसेनेकडे जाण्याचे भाकीत राजकीय निरीक्षक करीत अाहेत.
भाजपची मते वाढली
नगरपालिका निवडणुकीतभाजपची मतदानाची टक्केवारी वाढली, येवल्याचे नगराध्यक्षपदही मिळाले. आता भाजपला महापालिका निवडणूकीतही अधिक जागा मिळतील. -बाळासाहेबसानप, शहराध्यक्ष तथा अामदार, भाजप

जिल्हा परिषदेत शिवसेनेचे पारडे जड
नगरपालिका निवडणुकीचा सर्वात माेठा परिणाम लगतच्या जिल्हा परिषद गटांवर हाेणार अाहे. जिल्हा परिषदेत तूर्तास राष्ट्रवादीची सत्ता असून, त्याचे सर्व श्रेय माजी मंत्री छगन भुजबळ यांना जाते. भुजबळ यांनी त्यावेळी केलेल्या माेर्चेबांधणीमुळे राष्ट्रवादीची सत्ता अाली हाेती. मात्र, अाता भुजबळ तुरुंगात असताना खुद्द त्यांच्या येवला, नांदगाव मनमाड नगरपालिका क्षेत्रात राष्ट्रवादीला माेठा धक्का बसून सेनेला बुस्ट मिळाल्याने तालुका क्षेत्रात भगव्याचा प्रभाव वाढण्याची अटकळ व्यक्त केली जात अाहे. जिल्हा परिषदेत शिवसेनेचे १८ सदस्य अाहे, तर भाजपचे केवळ तीनच सदस्य अाहेत. त्यामुळे शिवसेनेचा भाजपपेक्षा अधिक प्रभाव यापूर्वीच असून, अाताची नगरपालिकेची स्थिती लक्षात घेत भाजपविराेधात लढाई झाली तर शिवसेनेला अधिक जागा मिळतील, असेही बाेलले जाते.

विश्वासाची पावती
शिवसेना ही सर्वसामान्यांशी कायमच प्रामाणिक असल्याने लाेकांनी नगरपालिका निवडणूकीत शिवसेनेवर विश्वास व्यक्त केला अाहे. त्याबद्दल जनतेचे अाभार. शिवसेनेसाठी हा विजय प्रेरणादायी अाहे.
-अजय बोरस्ते, शिवसेना महानगरप्रमुख
बातम्या आणखी आहेत...