आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेरे चेक देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना जनतेनेच दाखवली जागा, शिवसेना नेते अनिल देसाईंची टिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - स्वाक्षरी केलेले काेरे धनादेश अाणि लेटरहेड देऊन विकास कामे मंजुरीचे अाश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना नगरपालिका निवडणुकीत मतदारांनीच त्यांची जागा दाखवून दिल्याची टीका शिवसेना नेते अनिल देसाई यांनी केली. चार वाॅर्डांचा एक प्रभाग करण्याची व्यवस्था भाजपने जाणीवपूर्वक केली असली तरी त्याचा फटका या पक्षालाच बसणार अाहे, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रभाग रचनेमुळे इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने स्थानिक नेत्यांशी सलगी करून गट करू नका, असा सल्लाही त्यांनी या वेळी इच्छुकांसह कार्यकर्त्यांना दिला.

नाशिकरोड परिसरातील इच्छामणी लाॅन्स येथे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा शनिवारी जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी देसाई बोलत होते. देसाई म्हणाले, शिवसेना प्रमुखांचे बोट धरून जे राजकारणात चालायला शिकले, त्यांनीच अापल्या स्वार्थासाठी युती ताेडली. असे असले तरीही विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आल्याने भाजपाला चांगलेच उत्तर मिळाले आहे. विदर्भ तोडण्याची भाषा करणाऱ्यांना शिवसैनिकांनी अंगावर केसेस घेऊन विरोध केला आहे. युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या विचारानुसार शिवसेना शंभर टक्के समाजकारण आणि शंभर टक्के राजकारण करणार आहे. शिवसेना हा शिस्तप्रिय पक्ष असून त्यासाठी विरोधी पक्षातील केंद्रीय नेतेदेखील शिवसेनेचा दाखला देत असल्याचे ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...