आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गिरीश महाजनांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भडकला नाशकात हिंसाचार, नीलम गोर्‍हे यांचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/नाशिक- तळेगावमधल्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर निर्माण झालेली तणावाची परिस्थिती आता निवळली आहे. ग्रामीण भागातही जनजीवन पूर्वपदावर येत असताना या घटनेवरुन भाजप-शिवसेनेमध्ये जुंपण्याची शक्यता आहे.

नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्यामुळेच नाशिकमध्ये हिंसाचार भडकल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्या अामदार नीलम गाेऱ्हे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.

मुलीवर अत्याचाराची घटना झाल्यानंतर महाजन यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतरच नाशिक अशांत झाले. कायदेशीर प्रक्रियेचे पालन पालकमंत्र्यांनी करायला हवे होते, असेही त्या म्हणाया.

दुफळी माजवणारे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय
नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, नाशिक धुमसण्याला पालकमंत्री गिरीश महाजनच जबाबदार आहे. ना‍शिक जिल्ह्यात दुफळी माजवणारे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय होते, असा घणाघाती आरोपही त्यांनी केला आहे.

'बलात्कार झाला की नाही, हे वैद्यकीय अहवालानंतर पोलिस कोर्टात माहिती देतात.', असे वक्तव्य गिरीश महाजन यांनी केले होते. संवेदनशिल घटनेबाबत एखाद्या जबाबदार मंत्र्याने असे वक्तव्य करणे चुकीचे असल्याचे निलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, अफवा पसरवणाऱ्या सात संशयितांवर गुन्हे
बातम्या आणखी आहेत...