आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेतर्फे रस्त्यातील खड्ड्यांत वृक्षारोपण, म्हसरूळ परिसरात अांदाेलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक, सिडको - नाशिक शहरात प्रशासनाच्या कामाचा निकृष्टपणा समोर आला असून, काही दिवसांपूर्वीच बनविलेले रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे खड्ड्यांत रस्ता की रस्त्यात खड्डा, अशी अवस्था झाली आहे. प्रशासनाच्या या हलगर्जीपणाचा निषेध करण्यासाठी शिवसेनेेच्या वतीने शहर परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांत वृक्षारोपण करून अनोखे आंदोलन मंगळवारी करण्यात आले. महापालिकेत मनसेची सत्ता आल्यानंतर शहराचे नवनिर्माण करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे हेच का नवनिर्माण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सत्तेतील मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि ठेकेदार यांच्या बेजबाबदारपणामुळेच रस्त्यांची ही अस्वस्था झाली असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. रस्त्यांची कामे निकृष्ट झाली असल्याचा अनुभव नागरिकांना घ्यावा लागतो आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांत खड्डे पडून त्यात पाणी साचून वाहचालकांचा अपघात होत आहे. रस्त्यांची कामे करणाऱ्या ठेकेदारांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी शिवसेना नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघप्रमुख प्रवीण तिदमे, समन्वयक सचिन राणे, उपमहानगरप्रमुख सुनील पाटील, नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, विभागप्रमुख मयूर परदेशी, दीपक केदार, अश्विन जामदार, राजेंद्र मोहिते, विजय लहामगे, भैया पाटील, सतीश खैरनार, गणेश जाधव, अक्षय बोडके, वैभव राऊत, सनी साबळे, उमेश धामणे, उमेश जाधव, भूषण भामरे, संजय फरगडे, सागर पवार, सुमित गायकवाड, नाना पवार, जगन अहिरे, अनिकेत परदेशी, हिंदूराव कुदळे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

शिवसेनेच्या वतीने शहर परिसरात ठिकठिकाणी रस्त्यांवरील खड्ड्यांत वृक्षाराेपण करण्यात अाले. नाशिक शहर, पंचवटी, सिडकाे सातपूर परिसरात हे अनाेखे अांदाेलन करण्यात अाले. या अांदाेलनात शिवसैनिकांनी सहभाग घेतला. पंचवटीत अचानक झालेल्या या आंदोलनाने पोलिसांची धावपळ उडाली. पालिका प्रशासनाने निकृष्ट कामे केल्याचा अाराेप यावेळी करण्यात अाला.

नाशिक शहरासह सिडको भागात अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. प्रशासनाच्या या हलगर्जीपणाचा निषेध करण्यासाठी शिवसेनेेच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. खड्ड्यांत वृक्षारोपण करून प्रशासनाचा निषेध करण्यात आला.
म्हसरूळ परिसरातील रस्त्यावरील खड्ड्यामध्ये शिवसेनेतर्फे वृक्षाराेपण करण्यात अाले.
सातपूरमध्ये शिवसेनेतर्फे रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षाराेपण करताना लोकेश गवळी, महेंद्र शिंदे, गोरख घटोळ, विलास आहेर, युवराज धात्रक, वैभव ढिकले, आनंद दिघोले, योगेश जाधव, देवा जाधव, प्रवीण काठे, अशोक पारखे, मधुकर जाधव, दीपक मौले, गोकुळ नागरे, गोकुळ निगळ अादी.
रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत पालिकेतील सत्ताधारी मनसेविराेधात म्हसरूळ येथे सेना स्टाईल आंदोलन करण्यात अाले. पंचवटी परिसरात पावसाने पडलेल्या खड्ड्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी वृक्षारोपण केले. सत्ताधाऱ्यांसह पालिका प्रशासनाने निकृष्ट कामे केल्याने रस्त्यांवर खड्डे पडले. या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत सेनेच्या पदाधिकाऱ्यांना रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांत वृक्षारोपण करत अभिनव आंदोलन केले. महानगरप्रमुख अजय बोरस्ते, उपमहानगरप्रमुख दिगंबर मोगरे, विशाल कदम, अमोल सूर्यवंशी, संजय थोरवे, नीलेश मोरे, स्वप्नील धनगर, गोकुळ मते, दत्ता आंधळे, प्रमोद घोलप, लक्ष्मीताई ताठे, हरिभाऊ लासुरे, अक्षय डमाळे, अजय निकम, गौरव देशमुख, योगेश वाघ यांच्यासह पंचवटी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...