आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘उत्तर महाराष्ट्र मेळाव्या’ने शिवसेनेचे भाजपला उत्तर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अागामी महापालिकेची निवडणूक एकटे लढण्याची तयारी करा, असे स्पष्ट अादेश देत युतीभंगाची सूचना शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना दिल्यामुळे अाता सेनेने भाजपला जशास तसे उत्तर देण्याचे धाेरण स्वीकारले अाहे. भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला उत्तर देण्यासाठी सेना अाता उत्तर महाराष्ट्र कार्यकर्ता मेळावा घेण्याचे नियाेजन करीत असून, यावर विचारविनिमय करण्यासाठी मंगळवारी दुपारी १२ वाजता शालिमार येथील शिवसेना कार्यालयात पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे अायाेजन करण्यात अाले अाहे.
भाजप शिवसेनेला संपवायला निघाला असल्याने अागामी काळात निवडणुकीमध्ये शिवसेनेला भाजपशीच दाेन हात करावे लागणार अाहेत, असे उद्धव ठाकरे यांनी रविवारी मुंबईतील बैठकीत पदाधिकाऱ्यांना सांगितले अाहे. त्यामुळे सेनेने अाता भाजप विराेधात रणनीती तयार करायला प्रारंभ केला अाहे. महापालिकेच्या अागामी निवडणुकीत भगवा फडकविण्यासाठी सेनेने वातावरणनिर्मितीही सुरू केली अाहे. त्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये स्फुलिंग चेतविणे गरजेचे ठरणार अाहे.

मेळाव्यासाठी पदाधिकारी करणार चाचपणी : दुसरीकडेनाशिकमध्ये झालेल्या भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत नाशिकच्या मुद्यांची दखल फारशी घेतल्याने अाणि शिवसेनेला अनुल्लेखाने मारा, असा कानमंत्र वरिष्ठांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिल्याने शिवसैनिक भाजप विराेधात पेटून उठले अाहेत. भाजपच्या बैठकीला प्रत्युत्तर देण्यासाठी अाणि अागामी रणनीती ठरविण्यासाठी सेनेच्या वतीने नाशिकमध्ये लवकरच उत्तर महाराष्ट्र मेळावा घेण्यात येणार अाहे. येत्या १६ एप्रिल राेजी हा मेळावा घेता येईल का, याचीही चाचपणी सेनेचे पदाधिकारी करीत अाहेत. या मेळाव्याच्या नियाेजनासाठी शिवसेनेच्या वतीने मंगळवारी (दि. ५) दुपारी १२ वाजता पदाधिकाऱ्यांची बैठक अायाेजित केली अाहे. या बैठकीत मेळाव्याची तारीख काेणती असावी, स्वरूप कसे असावे, काेणत्या मुद्यांवर चर्चा करण्यात यावी अादींवर विचारमंथन हाेणार अाहे.

उत्तर महाराष्ट्र सेनामय करणार
^‘‘महापालिकेवर निवडणुकीनंतर निश्चितच भगवा ध्वज फडकेल, याचा अाम्हाला विश्वास अाहे. संपूर्ण उत्तर महाराष्ट्र शिवसेनामय करण्यासाठी अाता कार्यकर्ता मेळावा घेण्याचे नियाेजन सुरू झाले अाहे. - अजय बाेरस्ते, महानगरप्रमुख,शिवसेना
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या...भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठकीनंतर...