आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shivsena Party President Udhav Thackeray Comment On Chagan Bhujabal

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भुजबळांचे तर आता डिपॉझिटच जप्त करा; उद्धव ठाकरेंचे खुले आव्हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- छगन भुजबळ हे शिवसेनेला विकत घेऊ पाहताहेत असे बोलले जाते; पण शिवसेनेला विकत घेण्याची ताकद काँग्रेसची नाही आणि राष्ट्रावादीचीही. शिवसैनिक कधीही विकला जाणार नाही. कारण हा सैनिक मर्द आहे. भुजबळांची या र्मदाशी गाठ आहे. आपल्याला भुजबळांचा पराभव करायचा आहे. त्यांचे डिपॉझिटही जप्त करायचेच आहे, असे खुले आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी येथे दिले.

नाशिक लोकसभा मतदारसंघातील बूथप्रमुख व पदाधिकार्‍यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. दादासाहेब गायकवाड सभागृहात झालेल्या या मेळाव्यास मोठय़ा संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की, भुजबळांचा परभव तर करायचा आहेच; पण त्याबरोबर राज्यात आपले सरकारही येणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीनेदेखील शिवसैनिकांनी प्रयत्न करावेत. भोंदूगिरी, काळी विद्या आणि अंधर्शद्धेला आमचाही विरोध आहे; परंतु अंधर्शद्धेच्या नावाने आमच्या र्शद्धेच्या आड जर कोणी आडवा येत असेल तर त्याला आम्ही चीतपट केल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड इशारा देत ठाकरे यांनी जादूटोणाविरोधी विधेयकाबाबतही आपली भूमिका मांडली. हे विधेयक केवळ हिंदू धर्माला समोर ठेवून तयार न करता त्यात सर्वधर्मीयांचाही समावेश असावा, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली. दाभोलकरांचे मारेकरी अद्याप मिळाले नसतानाही हिंदुत्ववादी संघटनांवरच बंदी घालण्याची भाषा आम्ही खपवून घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गोडसेंचे कोड कौतुक
मनसेला ‘जय महाराष्ट्र’ करत शिवसेनेत प्रवेश करणार्‍या हेमंत गोडसे यांचा सत्कार मेळाव्यात करण्यात आला. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी स्वत:हून या सत्काराची इच्छा दर्शविली. तसेच ‘मी दिलेला उमेदवाराचा प्रचार करा; नंतर नाराजी ऐकून घेतली जाणार नाही’ असे सूचक उद्गारही या वेळी ठाकरे यांनी काढले. त्यामुळे शिवसेनेची उमेदवारी गोडसेंना जवळपास निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.

शरद पवार, राज ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, आर. आर. आबा यांच्यावर असे बरसले उद्धव ठाकरे..
0 देश खड्डय़ात गेला तरी चालेल, हिंदू चिरडले गेले तरी चालतील; पण मुस्लिमांच्या मतांच्या जिवावर मी पंतप्रधान बनेल, असे जर शरद पवारांना वाटत असेल तर ते आम्ही ते चालू देणार नाही.

0 मुंबईतील महिला पत्रकारावर बलात्कार करणार्‍यांची नावे जाहीर करण्याची गरज नाही. त्यांना थेट फासावरच लटकवा.

0अफजलखान वधाच्यावेळी शरद पवार असते तर ते म्हणाले असते, अफजलखान निष्पाप होता.

0 बलात्कार प्रकरणानंतर आर. आर. पाटील म्हणताहेत की ही वेळ राजीनाम्याची नाही. खरं तर आबा ही वेळ तुम्ही पदावरही बसण्याची नाही.

0 आमचा झेंडा उतरवल्यावर नाशिकमधील रस्ते सुधारतील, उड्डाणपुलावरून सुखद प्रवास होईल, अशी स्वप्ने दाखविली गेली; पण शिवसेनेने केलेल्या रस्त्यांना आजवर खड्डे पडलेले नाहीत. यांच्या काळात केलेल्या रस्त्यांना मात्र खड्डेच खड्डे.

0 इथल्या उड्डाणपुलालाही खड्डे पडले आहेत. आमच्या काळातील चिखल हे आज उडवताहेत; पण यांच्या चिखलीकराने उडवलेल्या चिखलाला तुम्ही विसरणार का?

0 भोंदूबाबांवर बंदी आणण्यासाठी राज्य विधिमंडळात स्वतंत्र विधेयक पास होतेय; पण राज्याच्या गादीवर बसलेल्या पृथ्वीराजबाबांचे काय करणार? या बाबाला राज्यातील भ्रष्टाचार दूर करता आलेला नाही की केवळ बघू, करू म्हणत या बाबाने दीड वर्षाचा काळ असाच घालवला आहे.

0 हुसेन दलवाई म्हणतात, सनातन संस्थेवर बंदी घाला. जेव्हा ओवेसी हिंदूंच्या विरोधात गरळ ओकतो, तेव्हा कशी दलवाईंची दातखिळी बसते..

0 बांगलादेशी नागरिकांनाही मतदार यादीत टाकण्याचे काम काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केले आहे. या राज्याचा मुख्यमंत्री आणि देशाचा पंतप्रधान ठरविण्याची जबाबदारी आमची आहे आणि ती आम्हीच पार पाडू.

भुजबळ राष्ट्रवादी सोडणार का?
मंडल आयोगाविषयीची भूमिका पटली नाही म्हणून छगन भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसत शिवसेना सोडली. आता मराठा आरक्षणाबाबत शरद पवार आणि भुजबळ यांची भूमिकाही परस्परविरोधी आहे. अशा परिस्थितीत भुजबळ राष्ट्रवादी सोडणार का, असा सवाल शिवसेनेचे सचिव सुभाष देसाई यांनी मेळाव्यात केला. तसेच, संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनीही भुजबळांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असे सांगितले.