आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नायलाॅन मांजाची केली शिवसेनेने हाेळी, विविध संस्था संघटनाचा ‘दिव्य मराठी’च्या अभियानात सहभाग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जीवघेण्या नायलाॅन मांजाविराेधात ‘दिव्य मराठी’ने सुरू केलेल्या ‘मांजा जीवघेणा, दुर्घटनेचा फणा’ अभियानात विविध संस्था, संघटना अाणि पक्षही सहभाग दर्शवित अाहेत. शिवसेनेच्या मध्य नाशिक विभागाच्या वतीने नायलाॅन मांजाची काही दिवसांपूर्वी हाेळी करण्यात अाली. नायलाॅन मांजाने अाजवर अनेकांचे जीव घेतले असून, जखमी हाेणाऱ्यांची संख्याही माेठी अाहे. दुसरीकडे पशु-पक्ष्यांनादेखील झाडावर वा अन्यत्र अडकलेल्या नायलाॅन मांजाचा फास बसत अाहे. या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ने तीन वर्षांपासून नायलाॅन मांजाविराेधी अभियान सुरू करून जनजागृती केली अाहे. त्यास सर्वच पातळ्यांवरून माेठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत अाहे. 

सर्वाेच्च न्यायालय, उच्च न्यायालय, राज्य शासन अाणि अाता राष्ट्रीय हरित लवादानेही यासंदर्भातील निर्णय देत धाेकेदायक नायलाॅन मांजा विक्री, साठवणूक वापरावर बंदी घातली अाहे. यापैकी कोणतेही एक कृत्य करणाऱ्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात येणार अाहे. तसेच, संबंधितांचा दुकान परवानाही रद्द करण्याची तरतूद कायद्यात अाहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पाेलिसांना पत्र देत नायलाॅन मांजाची विक्री साठवणूक करणाऱ्यांवर कारवाई करा, असे अादेश दिले अाहेत. मात्र, तरीही मांजाची विक्री काही दुकानांमध्ये सुरू अाहे. ही बाब लक्षात घेत शिवसेनेच्या मध्य नाशिक विभागाचे प्रमुख उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नायलाॅन मांजाची हाेळी करण्यात अाली. 

याप्रसंगी उपमहानगरप्रमुख संताेष कहार, राजाभाऊ क्षीरसागर, युवा सेनेचे समन्वयक सचिन बांडे, रवींद्र जाधव, विभागप्रमुख नाना काळे, अनिल साळुंके, पप्पू टिळे, युवा सेनेचे अंकुश राऊत, बाळासाहेब उगले, राजेंद्र वाकसरे, सुनील गाेडसे, पिंटू परदेशी अादी उपस्थित हाेते. 

‘सिद्धिविनायक’च्यावतीने हाेळी : पंचवटीयेथील सिद्धिविनायक अकॅडमीच्या वतीने नायलाॅन मांजाची हाेळी करण्यात अाली. यावेळी नायलाॅन मांजा असलेल्या १८ चकरी जाळण्यात अाल्यात. नायलाॅन मांजा वापरण्याबाबत अकॅडमीतील विद्यार्थ्यांमध्ये जागृती घडवून अानण्यासाठी नायलाॅन मांजामुक्त संक्रांतीसाठी शपथ घेण्यात अाली. हा उपक्रम अकॅडमीचे संचालक सुमित लांडगे जयश्री लांडगे यांनी राबविला. 

नायलॉन मांजा वापराविरोधी विद्यानिकेतन ११ मध्ये प्रतिज्ञा 
बालिकादिनानिमित्तविद्यानिकेतन ११ मध्ये सर्व विद्यार्थ्यानी नायलॉन मांजाचा वापर टाळण्याची प्रतिज्ञा घेतली. ‘दिव्य मराठी’ने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम शाळेत राबविण्यात येतो. यावेळी नायलॉन मांजाचे दुष्परिणाम विविध धोकादायक प्रसंग मुख्याध्यापिका मंगला पवार बाळासाहेब सातपुते यांनी सांगितले. शालेय परिसरातील नायलॉन मांजाचे संकलन करून यावेळी होळी करण्यात आली. मनीषा दंडगव्हाळ, रजनी खैरनार, मंगला गवळे, निर्मला देवरे, सुनीता भोकरे, रंजिता सीतावार, अर्चना आटाळे, मेघनाद ठाकरे, रतन बच्छाव, जान्हवी कुलकर्णी जगन्नाथ पगारे आदी उपस्थित होते.