आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारनियमन रद्द न केल्यास महावितरण कार्यालयांना कुलूप, सेनेचा इशारा; पणत्या भेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महावितरणच्या नियोजनशून्य कारभारामुळेच भारनियमनाच्या संकटाला नाशिककरांना ताेंड द्यावे लागत अाहे. यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशा मागणीचे निवेदन शिवसेनेने वीज वितरण कंपनीच्या मुख्य अभियंत्यांना शनिवारी (दि. ७) दिले. यावेळी पणत्या भेट देण्यात अाल्या. भारनियमन रद्द न केल्यास राज्यातील सर्व महावितरणच्या कार्यालयांना कुलूप लावून अभियंत्यांना कोंडण्यात येईल, असा इशाराही शिवसेनेने दिला अाहे. 
 
निवेदनातम्हटले अाहे की, महावितरणने वर्षभराची वीजनिर्मितीची गरज आपत्कालीन गरज लक्षात घेणे अपेक्षित हाेते. तसेच, ऑक्टोबरमध्ये सुरू होणाऱ्या कृषीग्राहकांच्या मागणीतील वाढ ऑक्टोबर हीट या बाबी समाेर ठेवून पुरेसे योग्य नियोजन करणे आवश्यक होते. तसे झाल्याने संपूर्ण राज्यात भारनियमन करावे लागले. महावितरणने महाजेन्को तसेच इतर खासगी कंपन्यांबरोबर दीर्घ मध्यम पल्ल्याचे वीज खरेदी करार केले आहेत. करारानुसार या कंपन्या वीज पुरवण्यास असमर्थ ठरल्यास करार तातडीने रद्द करावेत. वीजपुरवठ्याच्या खुल्या स्पर्धात्मक निविदा काढून वीज विकत घेऊन ग्राहकांची मागणी पुरवावी. 

ऐनवेळी विकत घेतलेली वीज कराराप्रमाणे कमी आलेली वीज यातील फरकाची रक्कम वीजग्राहकांवर टाकता पुरवठादार कंपन्यांकडून वसूल करण्यात यावी. ग्रामीण भागात सध्या पुरेसे पाणी उपलब्ध असल्याने शेतकरी ग्राहकांना विजेची खरी आवश्यकता आहे आणि तीन ते नऊ तास होणाऱ्या भारनियमनामुळे विजेअभावी पाणी मिळाल्यास शेती उत्पादन धोक्यात येणार आहे. 
 
यावेळी जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बाेरस्ते, गटनेते विलास शिंदे, राजू लवटे, डी. जी. सूर्यवंशी, आर. डी. धोंगडे, सुदाम डेमसे, सूर्यकांत लवटे, प्रशांत दिवे, संतोष गायकवाड, श्याम खोले, सुनील पाटील, शिवाजी भोर अादी उपस्थित हाेते. 
 
बातम्या आणखी आहेत...