आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली तरच सरकारला पाठिंबा, उद्धव ठाकरेंची महत्‍त्‍वपूर्ण घोषणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक -  ‘उत्तर प्रदेश निवडणुकीतील भाजपच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याची थाप मारली अाहे. या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त केल्यास अाणि त्यांना व्याजमुक्त कर्ज देण्याचे जाहीर केल्यास अाम्ही त्यांना पाठिंबा देऊ,’  अशी महत्त्वपूर्ण घाेषणा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी नाशिकमध्ये झालेल्या प्रचारसभेत केली. अाम्ही जे बाेलताे ते करताेच असेही ठाकरेंनी सांगितले. 
 
हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानात झालेल्या शिवसेनेच्या प्रचारसभेत ठाकरे म्हणाले की,
‘निवडणुका अाल्या की थापा मारल्याच जातात. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपचे सरकार येणार नाही हे पक्के माहीत असल्याने त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची घाेषणा केली अाहे. शिवरायांच्या महाराष्ट्रातही अशी घाेषणा हाेणे गरजेचे अाहे. शिवसेना जे बाेलते ते करते. केवळ मते पाहिजे म्हणून ‘अच्छे दिन अायेंगे’ म्हणत थापा मारत नाही.’ 
  
मनसेवर फारसे बाेलणे टाळले   
बिटकाे हाॅस्पिटलच्या कामाचे भूमिपूजन शिवसेनेच्या सत्ताकाळात माझ्या हस्तेच करण्यात अाले हाेते, परंतु मधल्या पाच वर्षांच्या काळात केवळ चार मजले बांधून झाले अाहेत. हे कशामुळे झाले यावर मला फार भाष्य करायचे नाही, असे सांगत उद्धव ठाकरेंनी मनसेच्या पालिकेतील सत्ताधाऱ्यांना चिमटा घेतला. मी ठरवले हाेते की मला या विषयावर बाेलायचे नाही, असे सांगत त्यांनी मनसे वा राज ठाकरे यांवर बाेलणे टाळले.  
 
म्हणजे भाजपने गुंडांना ‘अात’ टाकले   
मुख्यमंत्र्यांनी म्हणे काही महिन्यांपूर्वी सर्व पाेलिस स्टेशनच्या हद्दीतील गुन्हेगारांची यादी मागवली. सगळ्या गुन्हेगारांना म्हणे अात टाकताे. सगळ्या पाेलिस अधिकाऱ्यांना हायसे वाटले, चला अाता कामाचा ताणच मिटणार. त्यांनी झटपट याद्या बनवून मुख्यमंत्र्यांकडे पाठवल्या. मुख्यमंत्र्यांनी खराेखरच त्यांना अात टाकलं, म्हणजे भाजपत टाकलं, असे उद्धव यांनी सांगताच एकच हशा पिकला. 
 
बँकेत ज्याेतिषीच बसवायचा हाेता   
नाेटाबंदीच्या काळात सामान्यांना तर त्रास झालाच. पण ज्यांच्या घरी लग्न हाेते, त्यांना तर खूपच त्रास सहन करावा लागला. लग्न जुळल्याचा पुरावा म्हणून पत्रिका द्यायला बंधनकारक केले हाेते. खरं तर ह्यांनी मुला - मुलीचे गुण जुळतायत की नाही, ते पाहायला एखादा ज्याेतिषी पण प्रत्येक बँकेत बसवायला हवा हाेता, असे ठाकरेंनी उपहासाने सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
 
माेदींवर टीका करताना ठाकरे म्हणाले, ‘नाेटबंदीच्या रूपाने देशाला धमकी देणारा पहिलाच पंतप्रधान भारताला लाभलाय.   मेड इन पाकिस्तानच्या खाेट्या नाेटा बाजारात दाखल झाल्या अाहेत. अटलजी अाणि बाळासाहेबांसारखे विचार देणारे नेते देशात कुणीही नाही हे दुर्दैव अाहे. भाजपात गुंडांचा प्रवेश हाेत अाहे. हे गुंड भाजपत अाले तर ते संत हाेत नाहीत  भाजप मंत्रालयाचे गुंडालय करणार का?, असा सवालही त्यांनी केला.
 
 
बातम्या आणखी आहेत...