आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेला धक्का देत शिवसेना करणार अाता ‘शहराची बाग’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - विधानसभा निवडणुकीत माेठ्या डाैलात शहराची बाग करण्याचे अाश्वासन देणाऱ्या राज ठाकरे यांच्या सत्ताधारी मनसेकडून उद्यानांची देखभाल हाेत नसल्याचे बघून अाता शिवसेनेने शहरातील शंभर उद्याने दत्तक घेऊन नि:शुल्क विकसित करून दाखविण्याची तयारी दर्शवली अाहे. यासंदर्भात अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांची भेट घेऊन शिवसेना गटनेते अजय बाेरस्ते यांनी हा प्रस्ताव ठेवला. पहिल्या टप्प्यात शंभर माेठ्या उद्यानांची देखभाल करण्यासाठी यादीही दिली जाणार अाहे.

पालिकेत मनसेची सत्ता असून, राज ठाकरे यांची पॅशन असल्याने त्यांनी शहराची बाग करण्याचे स्वप्न नाशिककरांना दाखवले. प्रत्यक्षात अाहे ती उद्यानेही वाऱ्यावर साेडली गेली. महिला बचत गटांकडील उद्यानांची देखभाल काढून एकाच संस्थेला कंत्राट देण्याचा प्रस्ताव अायुक्तांनी ठेवल्यावर वर्षभर त्यावर काथ्याकूट सुरू अाहे. मध्यंतरी अटी-शर्तीत बदल करून महिला बचत गटांनाच ठेका देण्याचा निर्णय झाला, मात्र त्यावर शिक्कामाेर्तब झालेला नाही. या सर्वात साडेचारशेहून अधिक उद्याने सुकून गेल्याचे चित्र अाहे. मनसेला निवडणुकीपुरतीच उद्यानांची अाठवण हाेत असल्याचे बघून सेनेने उद्याने विकसित करून निवडणुकीच्या ताेंडावर नाशिककरांच्या दुआ मिळतील असा पवित्रा घेतला असून, शंभर उद्यानांची देखभाल शिवसेना तसेच पक्षाशी निगडित संस्था, छाेट्या संघटनांच्या माध्यमातून माेफत करून देण्याची याेजना अाखली अाहे. त्यासंदर्भात बाेरस्तेंनी गेडाम यांच्याशी चर्चेत त्यांनी सकारात्मक तयारी दाखविल्याचेही सांगितले.

सर्वांसाठी मुक्तद्वार
^गुलशनाबाद ही प्रतिमा जपण्यासाठी शहरातील उद्यानांच्या नि:शुल्क देखभालीचा निर्णय घेतला अाहे. यात अन्य पक्षांना सहभागी व्हायचे असेल तर मुक्तद्वार असेल. अखेर प्रश्न राजकारणाचा नसून, उद्यानांची पावसाळ्यापूर्वी चांगली स्थिती व्हावी एवढाच उद्देश अाहे. - अजय बाेरस्ते, गटनेते,शिवसेना
बातम्या आणखी आहेत...